
- Prep Time: १५ minutes
- Cook Time: १५ minutes
- Serving: ७-८ पोळ्यांसाठी
घडीची पोळी
घडीची पोळी ही महाराष्ट्रात रोज घरी बनविली जाणारी पोळी आहे. ही गरम गरम खाल्ली तर छान लागतेच पण काही तास बनवून जरी ठेवली तरी सुद्धा मऊसर आणि अगदी ताज्यासारखी लागते.
Ingredients
- गव्हाचे पीठ (कणीक) - २ कप आणि लाटताना लावायला आणखीन थोडी
- तेल - २-३ टीस्पून
- मीठ - १/२ टीस्पून
Instructions
- गव्हाचे पीठ एका तसराळ्यात काढून घ्या वा त्यात मीठ व २ टीस्पून तेल घाला.
- थोडे थोडे पाणी घालत त्याची मऊसर कणीक भिजवून घ्या.
- कणकेला वरून थोडेसे तेल लावून परत एकदा एकसारखी मळून घ्या व झाकून निदान १५ मिनिटे तरी ठेऊन द्या.
- पोळी लाटायला सुरवात करायच्या आधी तवा गरम करायला ठेवा.
- कणकेचा साधारण दीड इंच मोठा गोळा घेऊन तो हातांमध्ये फिरवून गोल व चपटा करून घ्या.
- थोडे लाटून साधारण ४ इंच मोठा करून घ्या व त्यावर बोटांनी थोडे से तेल लावा.
- हा गोल दोनदा दुमडून त्याची त्रिकोणी घडी घालून घ्या.
- ह्या त्रिकोणाची (व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे) लाटून मोठी, गोल व पातळ पोळी लाटून घ्या. पोळी लाटताना मध्ये जास्त जोर देऊ नका, कडेने पातळ लाटा.
- हलक्या हाताने पोळी हातावर उचलून गरम तव्यावर घाला. (तवा चांगला गरम असणे गरजेचे आहे.) (एकदा तुम्हाला सवय झाली की एक पोळी तव्यावर भाजायला टाकून, ती भाजता भाजता तुम्ही दुसरी पोळीही लाटायला सुरवात करू शकता.)
- काही सेकंदाताच पोळीवर छोटे छोटे फुगवटे दिसायला लागतील. तसे दिसू लागताच पोळी लगेच दुसऱ्या बाजूला उलटून टाका.
- आता पोळीच्या खालच्या बाजूला छोटे छोटे ब्राऊन डाग दिसेपर्यंत पोळी भाजा व मग परत दुसऱ्या बाजूस उलटून टाका.
- आता पोळी फुगायला लागेल. ती फुगू द्या व जर नीट फुगली नाही तर पोळीच्या कडा हलकेच एका टॉवेलने दाबून पोळी फुगायला मदत करा.
- पोळीच्या ह्या खालच्या बाजूला ही छोटे छोटे डाग आल्यावर पोळी तव्यावरून काढून घ्या.
- पोळीला दोन्हीकडून अगदी थोडे थोडे तेल लाऊन एका टॉवेल किंवा रुमालात गुंडाळून झाकण असलेल्या डब्यात बंद करून ठेवा.
- अश्याच प्रकारे सगळ्या कणकेच्या पोळ्या करून घ्या.