
दूधभोपळ्याची भाजी (टोमॅटो घातलेली)
दूधभोपळ्याची ही टोमॅटो घातलेली भाजी आंबट गोड व खूपच चविष्ट लागते. डाळ घालून केलेल्या भाजीपेक्षा ही भाजी चवीला पूर्ण निराळी आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
डाळ घालून केलेल्या दूधभोपळ्याच्या रेसिपी साठी पुढील लिंकवर क्लिक करा - https://goo.gl/2cTQgr
Ingredients
- दूधभोपळा - १ कप बिया काढून बारीक चिरलेला
- तेल - २ टीस्पून
- जिरे - १/४ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- लवंगा - ४
- दालचिनी - १ इंच मोठा तुकडा
- टोमॅटो - २, बारीक चिरलेले
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- धन्याची पूड - १/४ टीस्पून
- जिऱ्याची पूड - १/४ टीस्पून
Instructions
- दूधभोपळ्याची सालं काढून दूधभोपळा उभा चिरून घ्या.
- आतल्या जून व मोठ्या मोठ्या बिया कापून काढून टाका व दूधभोपळ्याच्या चौकोनी फोडी करून घ्या.
- कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, लवंगा, व दालचिनीचा तुकडा घाला.
- थोडेसे परतून टोमॅटोच्या फोडी घाला.
- त्यात लाल तिखट घालून थोडेसे परतून घ्या.
- टोमॅटोच्या फोडी मऊ झाल्यावर त्यात दूधभोपळ्याच्या फोडी घाला.
- सर्व मिसळून मीठ, धन्याची पूड, जिऱ्याची पूड व १/४ कप पाणी घाला.
- झाकण ठेऊन भोपळा मऊ होईपर्यंत शिजवा.
- ही नवीन चवीची दूधभोपळ्याची भाजी पोळीबरोबर वाढा.