
- Prep Time: १० minutes
- Cook Time: ५ minutes
कैरीचे झटपट लोणचे रेसिपी
कैरीचे हे झटपट लोणचे अगदी सोपी व सुरेख रेसिपी आहे. हे लोणचे जास्त दिवस टिकत नाही पण चवीला फारच छान लागते. फ्रीज मध्ये ठेवल्यावर हे लोणचे ८-१० दिवस पर्यंत टिकेल.
Ingredients
- कैरी - १ मोठी (चिरल्यावर साधारण ३ कप होईल अशी)
- लाल तिखट - १ टीस्पून
- मीठ - १ & १/२ टीस्पून
- गूळ - १/२ कप
Instructions
- कैरी स्वच्छ धुऊन व पुसून कोरडी करून घ्या.
- कैरीच्या फोडी करून अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्या.
- कोईला राहिलेला गर ही सुरीने कापून बारीक चिरून घ्या.
- कोय वगळून फोडी एका तसराळ्यात काढून घ्या.
- त्यात तिखट मीठ, व गूळ घालून सर्व मिसळून घ्या.
- गूळ विरघळल्यानंतर ह्याला भरपूर पाणी सुटेल. मग हे चविष्ट, झटपट लोणचे फ्रीज मध्ये ठेवा.