
पंजाबी भेंडी रेसिपी
पंजाबी भेंडीची ही रेसिपी पंजाबी किंवा नॉर्थ इंडियन चव असलेली कोरडी भेंडीची भाजी आहे. पटकन होणारी व चटपटीत अशी ही भाजी तुम्ही पोळी फुलका किंवा नान बरोबर खाऊ शकता.
Ingredients
- भेंडी - १५-२० (पाव किलो)
- तेल - 3 tsp
- जिरे - 1/2 tsp
- हिंग - एक चिमूट
- हळद - १/४ टीस्पून
- कांदा - १ छोटा, उभा व लांब लांब चिरलेला
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- आमचूर - १/२ टीस्पून
Instructions
- भेंडी स्वच्छ धुऊन कोरड्या करून घ्या व चिरून साधारण एक इंच मोठे काप करून घ्या.
- तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद व कांद्याचे काप घाला.
- कांदा किंचित गुलाबी दिसेपर्यंत परतून घ्या.
- मग भेंडी घालून बारीक ते मध्यम आचेवर भेंडी मऊ शिजेपर्यंत परतून घ्या. मधे मधे हलवायला विसरू नका. (शिजल्यावर भेंडीचा रंग ही थोडा गडद होईल.)
- भेंडी शिजल्यावर त्यात मीठ, लाल तिखट, व आमचूर घालून सर्व मिसळून घ्या व एखाद्या मिनिटाने गॅस बंद करा.
- गरम व चटपटीत पंजाबी भेंडी पोळी, फुलका किंवा नान बरोबर वाढा.