
- Prep Time: ३० minutes
- Cook Time: १० minutes
- Serving: ३-४ जणांसाठी
फोडणीचे वरण रेसिपी
तुरीच्या डाळीपासून बनलेले हे फोडणीचे वरण शाकाहारी लोकांसाठी proteins चा खूपच चांगला स्रोत आहे. प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असलेली ही खमंग डाळ अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. तशीच कमी किंवा जास्त पातळ ठेऊन हे फोडणीचे वरण पोळीबरोबर व तसेच भाताबरोबर ही खायला फार छान लागते.
Ingredients
- तुरीची डाळ - १ कप
- तेल - ४ टीस्पून
- मोहरी - १ टीस्पून
- जिरे - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २ उभ्या चिरलेल्या
- कढिलिंब - ५-६
- आलं - १ & १/२ टीस्पून किसलेलं
- लसूण - १ टेबलस्पून बारीक कापलेला
- मीठ - स्वादानुसार
- टोमॅटो - १ बारीक चिरलेला
- कोथिंबीर - बारीक चिरलेली वरून सजावटीसाठी पसरायला
Instructions
- तुरीची डाळ धुऊन त्यात २ कप पाणी घाला व प्रेशर कुकर मधे तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. तीन शिट्ट्या झाल्यावर पाच मिनिटे गॅस बारीक करून ठेवा व मग बंद करा.
- कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, हळद व हिरव्या मिरच्या घाला.
- मग त्यावर कढिलिंब, किसलेलं आलं, व बारीक चिरलेला लसूण घाला.
- आलं व लसूण किंचित ब्राउन दिसेपर्यंत थोडे परतून घ्या.
- मग त्यावर शिजलेली डाळ घालून, डाळ किती पातळ करायची आहे त्याप्रमाणे पाणी घाला.
- चवीप्रमाणे मीठ व टोमॅटो घाला व मधे मधे हालवत बारीक आचेवर डाळीला उकळी येऊ द्या.
- मग गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व हे गरम गरम फोडणीचे वरण पोळी, भात, किंवा नान बरोबर वाढा.