
- Prep Time: १० minutes
- Cook Time: ५ minutes
- Serving: ४ जणांसाठी
धिरडे रेसिपी
धिरडे म्हणजे अनेक धांन्यांची पिठं मिसळून बनविलेला मऊसर डोसा. इथे दिलेली रेसिपी तुम्ही आवडीनुसार आणखीन काही पिठं (जसे ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, सोयाबीन चे पीठ, वगैरे) मिसळून किंवा काही पौष्टिक भाज्या (जसे गाजर, पालक, मेथी, पुदिना, गोभी, वगैरे) ही घालून अधिक चवदार व पौष्टिक बनवू शकता. हा झटपट बनणारा पदार्थ ब्रेकफास्ट किंवा मधल्या वेळेला खायला मुलांना फार आवडतो व पौष्टिक ही आहे.
Ingredients
- गव्हाचे पीठ (आटा) - १ कप
- डाळीचे पीठ (बेसन) - १/४ कप
- तांदुळाची पिठी - १/४ कप
- इतर एखादे पीठे जसे ज्वारीचे, बाजरीचे किंवा सोयाबीन चे पीठ - १/४ कप
- तेल - २ टेबलस्पून पिठासाठी व नंतर आवश्यकतेनुसार
- मीठ - स्वादानुसार
- लसणाची पेस्ट - १ टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) किंवा लाल तिखट - १ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- आपल्या आवडीच्या भाज्या (ऐच्छिक) - १/४ कप
- कोथिंबीर (ऐच्छिक) - २ टेबलस्पून
Instructions
- गव्हाचे पीठ, बेसन, तांदुळाची पिठी, व ज्वारी, बाजरी किंवा इतर कोणतेही धांन्याचे पीठ एकत्र मिसळून घ्यावे.
- त्यात मीठ, २ टेबलस्पून तेल, लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट किंवा लाल तिखट घालून मिसळा.
- आवडत असल्यास काही भाज्या (जसे किसलेले गाजर किंवा दुधी, बारीक चिरलेला पालक किंवा मेथी, किसलेली गोभी, पुदिना वगैरे) ही घालून मिसळा. बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालून मिसळून घ्या.
- हळू हळू पाणी घालत, व पिठाच्या गुठळ्या मोडत डोस्याच्या पिठाप्रमाणे किंचित दाटसर पीठ भिजवून घ्या.
- तवा गरम करून त्याच्या मधोमध साधारण ४ टेबलस्पून पीठ घालून चमच्याच्या मागील बाजूने पातळ व गोल धिरडे पसरून घ्या.
- कडेने १/२ टीस्पून तेल सोडा व कड ब्राउन दिसायला लागेपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या.
- मग दुसऱ्या बाजूस उलटून टाका.
- दुसऱ्या बाजूवर ही थोडे ब्राउन डाग आल्यावर तव्यावरून काढून घ्या.
- गरम गरम धिरडे लोणी, लोणचे किंवा एखाद्या चटणीबरोबर वाढा.