
- Prep Time: २० minutes
- Cook Time: १५ minutes
- Serving: १० परोठयांसाठी
बटाट्याचा पराठा रेसिपी
बटाट्याचा पराठा हा एक उत्कृष्ट व सर्वांच्या आवडीचा ब्रेकफास्ट मेनू आहे. विशेषतः मुलांना हा फार आवडतो. इथे दिलेल्या रेसिपीत मी हाच पराठा त्याची मूळ चव न बदलू देता अधिक पौष्टिक बनवायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
Ingredients
- कव्हरसाठी :
- गव्हाचे पीठ (कणीक) - २ कप
- मीठ - १ टीस्पून
- पालक / मेथी किंवा त्यासारखी इतर कोणतीही हिरव्या पानांची भाजी - १ & १/२ कप बारीक चिरलेली
- तेल - २-३ टीस्पून कणकेसाठी व पराठा भाजताना आणखीन लागेल तसे
- सारणासाठी:
- बटाटे - ५ मोठे उकडून सालं काढलेले
- कांदा - १ बारीक चिरलेला
- लसणाच्या पाकळ्या - ४-५ मोठ्या मोठ्या
- आल्याचा तुकडा - २-३ इंच मोठा
- ठेचलेल्या हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट - २ मिरच्या किंवा लाल तिखट चवीप्रमाणे
- मीठ - चवीप्रमाणे
Instructions
कणकेसाठी :
गव्हाचे पीठ, मीठ, २-३ टीस्पून तेल व चिरलेली हिरवी भाजी सर्व एकत्र करून पाण्याने पोळ्यांप्रमाणे मऊसर कणीक भिजवून घ्या व १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
सारणासाठी :
- उकडलेल्या बटाट्याची सालं काढून ते मॅशर ने किंवा हाताने मॅश करून घ्या (मॅश केल्यानंतर त्यात मोठे तुकडे राहू देऊ नका.)
- त्यात कांदा, हिरवी मिरची किंवा तिखट व मीठ घाला. तसेच आलं आणि लसणाची पेस्ट करून घ्या व तीही बटाट्यात मिसळा.
- सर्व एकत्र मिसळून सारं तयार करून घ्या.
- ह्या सारणाचे साधारण ३ इंच मोठे गोळे तयार करून घ्या.
पुढील कृति :
- भिजवून ठेवलेल्या कणकेचा साधारण २ इंच मोठा गोळा घेऊन तो बोटांनी दाबत कडेने चपटा करून वाटीप्रमाणे खोलगट करून घ्या.
- त्यात सारणाचा एक गोळा ठेऊन वरून कणकेचे तोंड बंद करून टाका.
- हाताने हलकेच दाबून गोळा चपटा करून घ्या व दोन्ही बाजूंनी थोडी कोरडी कणीक लाऊन घ्या.
- आता पोळपाटावर लाटून अंदाजे १/२ से. मी. जाड व गोल असा पराठा लाटून घ्या. पराठे हे जाड जाडच असतात. त्यामुळे पोळीप्रमाणे पातळ लाटू नका.
- गरम तव्यावर टाकून व दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल सोडून पराठा तव्यावर खमंग भाजून घ्या.
- गरम गरम पराठा लोणी, दही, व एखाद्या लोणच्याबरोबर वाढा.