
भरली भेंडी रेसिपी
भरली भेंडीची ही भाजी चमचमीत, तिखट व कोरड्या प्रकारची भेंडीची भाजी आहे जी तुम्ही पोळी, फुलका किंवा नान बरोबर खाऊ शकता.
Ingredients
- भेंडी - १५-२० (अंदाजे पाव किलो)
- डाळीचं पीठ (बेसन) - ४ टेबलस्पून
- धन्याची पूड - ४ टीस्पून
- जिऱ्याची पूड - २ टीस्पून
- आमचूर - १ टीस्पून
- लाल तिखट - १/२-१ टीस्पून किंवा स्वादानुसार
- मीठ - स्वादानुसार
- तेल - २ टेबलस्पून
- कोथिंबीर (ऐच्छिक) - वरून सजावटीसाठी
Instructions
- भेंडी स्वच्छ धुऊन, पुसून कोरड्या करून घ्या.
- देठं काढून टाका व सगळ्या भेंड्यांना मध्ये चीर देऊन भरण्यासाठी जागा तयार करून घ्या.
- डाळीचं पीठ, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, आमचूर, लाल तिखट व मीठ एकत्र करून घ्या व हा मसाला सगळ्या भेंड्यांमध्ये भरून घ्या. भरल्यावर भेंड्याचे आवडीप्रमाणे थोडे छोटे किंवा मोठे काप करून घ्या.
- कढई मध्ये तेल गरम करून त्यात भरलेल्या भेंड्या घाला. एक मिनिट परतून गॅस बारीक करा.
- झाकण ठेऊन, दर पाच मिनिटांनी हालवत, भेंड्या पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
- आता उरलेला मसाला ही घाला व झाकण ठेऊन १-२ मिनिटे आणखीन शिजू द्या व मग गॅस बंद करा.
- आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व भरली भेंडी पोळीबरोबर वाढा.