
- Prep Time: १० minutes
- Cook Time: ६० minutes
- Serving: अंदाजे ३५ पीस
चंपाकळी (आकर्षक खारी शंकरपाळी) रेसिपी
चंपाकळी म्हणजे चंपाकळीच्या आकाराची खारी शंकरपाळी. ही विशेष प्रकारची शंकरपाळी दिसायला खूपच सुरेख दिसते व बनवायला खूपच सोपी आहे. विशेषतः लहान मुलांना ही फार आवडते. ह्यात तुम्ही वेगवेगळे रंग घालून आणखीन आकर्षक बनवू शकता.
Ingredients
- मैदा - २ कप
- तेल - २ टेबलस्पून मैदा भिजविताना व तळण्यासाठी आणखीन
- कलौंजी किंवा ओवा - 1/4 tsp १/४ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- खायचा रंग (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे
Instructions
- मैद्यात २ टेबलस्पून तेल, ओवा किंवा कलौंजी, चवीप्रमाणे मीठ व खायचा रंग घालून मिसळून घ्या.
- थोडे थोडे पाणी घालून मैदा पुऱ्यांच्या कणकेप्रमाणे थोडा घट्ट भिजवून घ्या.
- भिजविलेल्या मैद्याचे १- १/२ इंच मोठे गोळे करून घ्या.
- प्रत्येक गोळा हातांमध्ये फिरवून गोल व चपटा करून घ्या.
- एकावेळी एक गोळा घेऊन त्याची पातळ पुरी लाटून घ्या.
- खाली व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे पुरीला सुरीने चिरा पाडून गुंडाळून घ्या.
- अश्याच पद्धतीने सगळ्या मैद्याच्या चंपाकळ्या बनवून घ्या.
- आता तयार चंपाकळी बारीक ते मध्यम आचेवर गरम तेलात किंचित गुलाबी रंगाची होईपर्यंत तळून घ्या.
- पूर्ण गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.