
- Prep Time: ५ minutes
- Cook Time: ५ minutes
कोथिंबिरीची हिरवी चटणी रेसिपी
कोथिंबिरीची हिरवी चटणी एक मल्टिपर्पस चटणी आहे. ही तुम्ही अनेक पदार्थांबरोबर जसे भेळ, समोसा किंवा कोणताही चाट, इडली, अडई, उत्तपम, किंवा पराठयांबरोबर ही खाऊ शकता. ही बनवायला अगदी सोपी आहे व कधीही झटपट बनविता येते. फ्रीज मध्ये ठेवल्यास ही १०-१५ दिवस चांगली टिकू शकेल.
Ingredients
- कोथिंबीर - १/२ कप स्वच्छ धुतलेली
- हिरव्या मिरच्या - ३-४
- लिंबाचा रस - १ टेबलस्पून
- लसणाच्या पाकळ्या - २
- मीठ - स्वादानुसार
- शेव, पापडी किंवा बटाटाच्या चिप्स - २ टेबलस्पून
Instructions
- चटणी साठी आवश्यक वर दिलेली सर्व सामग्री एका मिक्सरच्या जार मध्ये एकत्र करून घ्या.
- गरजेप्रमाणे पाणी घालून दाट किंवा पातळ चटणी तयार करून घ्या. (मी ही चटणी आधी दाटसरच बनविते म्हणजे पराठा, समोसा, इडली वगैरे बरोबर खाता येते आणि भेळ, चाट वगैरे बरोबर खाताना गरजे प्रमाणे पाणी घालून ही पातळ करून घेता येते.)
- फ्रीज मध्ये ठेवल्यास ही १०-१५ दिवसांपर्यंत ही चांगली टिकते.