
- Yield: २-३ जणांसाठी
- Prep Time: ५ minutes
- Cook Time: १५ minutes
- Serving: २-३ जणांसाठी
बटाटा व फ्लॉवर ची भाजी रेसिपी
बटाटा व फ्लॉवर ची ही भाजी अगदी सोपी साधी रेसिपी आहे. ह्यात कमीत कमी मसाले आहेत व त्यामुळे ह्यात भाज्यांची मूळ चव टिकून राहते. रोजच्या जेवणात ही पोळी बरोबर खायला खूप छान लागते व पौष्टिक ही आहेच.
Ingredients
- फ्लॉवर - २ कप
- तेल - २ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २ बारीक चिरलेल्या किंवा मिरच्यांची पेस्ट
- मीठ - चवीनुसार
- धन्याची पूड - १/२ टीस्पून
- जिऱ्याची पूड - १/२ टीस्पून
- साखर - १ टीस्पून
- कोथिंबीर - आवडीप्रमाणे, वरून पसरायला
- बटाटा - १, मोठा मोठा चिरलेला
- हळद - १/४-१/२ टीस्पून
Instructions
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व हळद घाला.
- त्यावरच बटाटे ही घाला व सगळे मिसळून, वर झाकण ठेऊन बटाटे अर्धवट शिजवून घ्या.
- आता त्यावर फ्लॉवर घाला. तसेच मिरच्या, मीठ, साखर, धन्याची पूड व जिऱ्याची पूड ही घालून सगळे मिसळून घ्या.
- आता झाकण ठेऊन फ्लॉवर व बटाटा पूर्ण शिजवून घ्या. मात्र बटाटा तसेच फ्लॉवर सुद्धा खूप जास्त मऊ शिजवू नका. दोन्हीच्या फोडी अखंड राहिल्या पाहिजेत, पण करकरीत तर नसल्या पाहिजेत.
- शिजल्यावर गॅस बंद करा व आवडत असेल तर वरून कोथिंबीर पसरून गरम गरम भाजी पोळीबरोबर वाढा.