
- Prep Time: १५ minutes
- Cook Time: १५ minutes
- Serving: ५ जणांसाठी
बटाट्याची भाजी रेसिपी (नॉर्थ इंडियन पद्धतीची, कांदा किंवा लसणाशिवाय)
ही बटायाची रस्सा भाजी उत्तर भारतात, लग्न-कार्य असताना घरी अनेकदा बनविली जाते. ह्यात कांदा व लसूण अजिबात वापरला जात नाही पण बडीशेपेचा मात्र खमंग वास असतो. ही भाजी अगदी झटपट बनविता येते व पुरी किंवा फुलक्याबरोबर छान लागते.
Ingredients
- तेल - ५ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- बडीशेप - १ & १/४ टीस्पून
- टोमॅटो - १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला
- हळद - १/४ टीस्पून
- लाल तिखट - १/२ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- कसूरी मेथी - १ & १/२ टीस्पून
- धन्याची पूड - १ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- बटाटे - ५ मध्यम आकाराचे, उकडून सालं काढलेले
Instructions
- उकडलेले बटाटे हाताने फोडून त्याचे तुकडे करून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला.
- जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कसूरी मेथी व बडीशेप घाला.
- किंचित परतून त्यात टोमॅटोच्या फोडी घाला.
- त्यात हळद, लाल तिखट, व धन्याची पूड घालून चांगले मिसळा.
- टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्या.
- त्यावर १ कप पाणी घाला व त्यावर बटाटे घाला.
- त्यातच बटाटे बुडेपर्यंत आणखीन पाणी घाला व चवीप्रमाणे मीठ घाला.
- भाजीला उकळी येऊ द्या व ५-१० मिनिटे अगदी बारीक गॅसवर उकळत ठेवा. मग गॅस बंद करा.
- गरम गरम बटाट्याची ही भाजी पुरी किंवा फुलक्याबरोबर वाढा.