
- Prep Time: ६०-१२० minutes
- Cook Time: १५ minutes
- Serving: ४ जणांसाठी
भटूरा / भटूरे रेसिपी
भटूरा किंवा भटूरे ही एक उत्तर भारतीय रेसिपी आहे. भटूरा म्हणजे मैदा फेरमेन्ट करून बनविलेली पुरी. मात्र ही पुरी फक्त छोले म्हणजेच चना मसाला ह्या बरोबरच छान लागते व संपूर्ण डिश ला 'चना-भटूरा' किंवा 'छोले-भटूरे' या नावानी ओळखले जाते. ही खूपच चविष्ट व प्रसिद्ध अशी नॉर्थ इंडियन रेसिपी आहे व मोठ्यांना आणि लहानांना ही खूप आवडते. भटूरे मैद्याचे असल्यामुळे गार झाल्यावर चिवट किंवा वातड होतात त्यामुळे भटूरे गरम गरमच वाढायला व खायला हवेत.
Ingredients
- मैदा - ३ कप
- मीठ - ३/४ टीस्पून
- साखर - १ टीस्पून
- दही - ३ टेबलस्पून
- ड्राय ऍक्टिव्ह यीस्ट (dry active yeast) - १ & १/२ टीस्पून
- तेल - १ टेबलस्पून + भटूरे तळण्यासाठी आणखीन
Instructions
- यीस्ट प्रूफिंग (Yeast-Proofing) - (यीस्टच्या पाकिटावर जर लिहिले असेल की यीस्ट पिठात डायरेक्ट मिसळले तर चालते, तर यीस्ट प्रूफिंग ची ही स्टेप वगळावी.) यीस्ट प्रूफिंग साठी १ & १/२ टीस्पून यीस्ट १ टेबलस्पून गरम पाण्यात १० मिनिटे भाईजवून ठेवावे. १० मिनिटांनी यीस्ट पाण्यात मिसळून फेस तयार होईल.
- मैद्यात, मीठ, साखर, यीस्ट (प्रूफिंग केलेलं किंवा ना केलेलं), १ टेबलस्पून तेल व दही घालून मिसळून घ्या. त्यात अंदाजे पाऊण कप पाणी हळू हळू घालत मैदा चांगला मळून घेत, किंचित घट्टसर असा भिजवून घ्या.
- त्यावर झाकण ठेऊन एक ते दोन तास ऊबदार जागेवर ठेऊन द्या.
- एक ते दोन तासांनी भिजविलेला मैदा फेरमेन्ट होईल व फुलून जवळ जवळ दुप्पट होईल.
- तळ हाताला थोडेसे तेल लाऊन परत एकदा मैदा मळून घ्या व त्याचे १ ते दीड इंच मोठे असे भाग करून घ्या. प्रत्येक भाग हातांमध्ये फिरवून गोल व चपटा करून घ्या.
- आता तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा व मग प्रत्येक भागाची, मधे जाड पण कडेला पातळ राहील, अशी जाडसर पुरी लाटून घ्या. पुरी गोल किंवा अंडाकृती लाटली तरी चालेल.
- गरम तेलामध्ये ही पुरी दोन्ही बाजूंना किंचित सोनेरी दिसेपर्यंत तळून घ्या.
- तळलेली पुरी एका पेपर टॉवेल वर काढा व लगेचच गरम गरम भटूरा छोल्यांबरोबर वाढा.
- असेच सर्व मैद्याचे भटूरे बनवून घ्या आणि मऊ लुसलुशीत भटूरे गरम गरम छोले किंवा चना मसाला बरोबर वाढा.