जवसाची चटणी
जवस आपल्या शरीरात चांगले cholesterol वाढवायला मदत करतात. त्यामुळे ही जवसाची चविष्ट चटणी जर रोजच्या खाण्यात असली तर आपल्या तब्बेतीला ते लाभदायकच ठरेल.
Ingredients
- जवस - १ कप
- सुके खोबरे - १/४ कप किसलेले
- तीळ - १/२ कप
- शेंगदाणे - १/२ कप
- तेल - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- कढीपाला - १ कप
- लाल मिरच्या - १२
- मीठ - स्वादानुसार
Instructions
- एका कढई मध्ये जवस चांगले गडद ब्राउन रंगाचे होईपर्यंत ५-६ मिनिटांपर्यंत भाजून घ्या.
- आणि एका वेगळ्या तसराळ्यात काढून घ्या.
- त्याच कढईत शेंगदाणे ही भाजून घ्या. त्यांच्यावर छोटे छोटे काळे डाग दिसू लागल्यावर दाणे ही त्याच तसराळ्यात काढून घ्या.
- आता सुके किसलेले खोबरे ही गुलाबी रंगावर भाजून घ्या आणि तसराळ्यात काढा.
- तसेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्या व तसराळ्यात काढा.
- १ टीस्पून तेल गरम करून त्यात कढीपाला घाला.
- कढीपाल्याचा तडतडण्याचा आवाज थांबेपर्यंत परता.
- त्यातच लाल मिरच्या घालून १-२ मिनिटे परता म्हणजे मिरच्या कुरकुरीत होतील.
- गॅस बंद करून कढईतील सर्व पदार्थ तसराळ्यात काढा.
- आता तसराळ्यातील सगळे पदार्थ गार होऊ द्या आणि मग मिक्सर मध्ये काढून घ्या.
- स्वादानुसार मीठ घालून बारीक वाटा आणि चटणी बनवा.
- ही चटणी थोडे दही घालून पोळी बरोबर ही खायला छान लागते.