- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 15 minutes
तिळाची वडी रेसिपी
तिळाची वडी हा थंडीच्या दिवसांत खायला फारच छान व पौष्टिक पदार्थ आहे. संक्रांतीच्या सणाचा तर हा खास पदार्थ! तिळाची वडी गूळ घालून किंवा साखर घालून ही बनविता येते. पण दोन्हीची कृति निराळी आहे. इथे मी गूळ वापरून ही तिळाची वडी बनविली आहे. साखरेची वडी खायला कुरकुरीत असते व ही गुळाची वडी मऊसर असते.
Ingredients
- गूळ - १ & १/२ कप
- तीळ - १ & १/२ कप
- दाण्याचे कूट - १/२ कप
- तूप - २ टीस्पून + पोळपाटाला लावायला थोडे आणखीन
- दूध - १ टीस्पून
- वेलदोड्याची पूड - आवडीप्रमाणे
- सुके खोबरे - १ टेबलस्पून किसलेले
Instructions
- तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत खमंग भाजून घ्या.
- त्यातले अर्धे तीळ मिक्सर मध्ये भरड वाटून घ्या.
- पोळपाटाला तूप लाऊन तयार ठेवा.
- एका कढईत गूळ घालून बारीक गॅसवर विरघळायला ठेवा.
- गूळ विरघळून जेंव्हा फेस व्हायला लागेल तेंव्हा गॅस बंद करून टाका.
- गुळात भाजून वाटलेले तीळ, भाजलेले तीळ, दाण्याचे कूट, तूप, दूध, व वेलदोड्याची पूड घाला.
- सर्व मिसळून गोळा तयार करा.
- तूप लावलेल्या पोळपाटावर वरील मिश्रणाचा गोळा ठेऊन तूप लावलेल्या लाटण्याने अंदाजे १/२ से. मी. जाड लाटून घ्या.
- वरून खोबरे पसरा व परत एकदा लाटणे फिरवा.
- आता चौकोनी किंवा आवडीच्या आकाराचे काप करून घ्या.
तिळगुळाची मऊसर वडी बनवताना तुम्ही चिक्कीचा गूळ वापरला की साधा,नेहमीचा गूळ वापरला?
नेहमीचा साधाच गूळ वापरला.