कैरीची चटणी रेसिपी
कैरीच्या दिवसांत ही चटणी पोळी किंवा भाकरी बरोबर खायला खूपच सुरेख लागते. तशीच ब्रेडला किंवा सँडविच ला लावायला सुद्धा ही चटणी खूप छान लागते. ह्यात दिलेले गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी जास्त करायला हरकत नाही.
ह्याच चटणीचा एक आणखीन वेगळा प्रकार पुढील लिंकवर दिलेला आहे - (कैरीची लालसर चटणी)
Ingredients
- कैरी - १/२ कप, साल काढून किसलेली
- दाण्याचे कूट - १/२ कप
- हिरव्या मिरच्या - ४-५ मिरच्या छोटे तुकडे केलेल्या
- गूळ - १/४ कप (कैरीच्या आंबटपणाप्रमाणे थोडा कमी/जास्त)
- मीठ - चवीप्रमाणे
- जिरे - १ टीस्पून
- कोथिंबीर - १/४ कप चिरलेली
Instructions
- किसलेली कैरी व बाकी सर्व सामग्री एकत्र एका मिक्सर च्या भांड्यात घाला.
- जर कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचे प्रमाण थोडे वाढवायला हरकत नाही. तसेच कैरी कमी आंबट असेल तर गूळ थोडा कमी घालावा.
- लागेल तसे वाटण्यापुरते थोडे थोडे पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्या.
- कैरीची ही आंबटगोड चटणी पोळी किंवा भाकरी बरोबर वाढा. ही चटणी फ्रीजमध्ये २-३ आठवडे छान टिकेल.