Uma's Kitchen

  • Home
  • Recipes
    • Snacks
    • Soups
    • Breads
    • Rice
    • Veggies
    • Lentils
    • Dosas
    • Salads
    • Dessert
  • Specialities
    • Drinks
    • Left-over-food recipes
    • Pickels/Chutneys
    • Spices
  • Collections
    • Video Recipes
    • Maharashtrian
    • North Indian
    • South Indian
    • Diwali
    • Chaat
  • Videos
  • More
    • Search
    • Marathi Blog
    • Blog
    • About
  • English
  • हिन्दी

ढोकळा – इडलीच्या पिठाचा रेसिपी

ढोकळा – इडलीच्या पिठाचा रेसिपी
  • Serving: १५ - २० ढोकळा पीसेस
Print

ढोकळा – इडलीच्या पिठाचा रेसिपी

By Uma Abhyankar मार्च 11, 2021

इडलीच्या पिठाची इडली करून जर कंटाळा आला असेल तर त्याच पिठापासून बनविलेला हा झटपट खमंग ढोकळा तुम्हाला खूप आवडेल. अगदी हलका-फुलका व रवाळ असा हा ढोकळा कोथिंबिरीच्या किंवा खोबऱ्याच्या, किंवा कोणत्याही साऊथ इंडियन चटणी बरोबर छान लागतो.

Ingredients

  • इडलीचं पीठ - 2 cups
  • डाळीचं पीठ (बेसन) - 2 tbsp
  • किसलेलं आलं - १ & १/२ टीस्पून
  • हिरव्या मिरच्या - २ बारीक ठेचलेल्या
  • मीठ - चवीप्रमाणे
  • सोडियम बायकार्बोनेट (खायचा सोडा) - १/२ टीस्पून
  • तेल - १ & १/२ टीस्पून
  • बारीक मोहरी - १ टीस्पून
  • हिंग - 1/4 tsp
  • तीळ - १ टीस्पून
  • सायट्रिक ऍसिड - १/४ टीस्पून
  • साखर - १ टीस्पून

Instructions

  1. इडलीच्या पिठात डाळीचं पीठ घालून मिसळून घ्या. डाळीच्या पिठाच्या गुठळ्या राहू देऊ नका.
  2. त्यातच आलं, मिरच्या, मीठ व सायट्रिक ऍसिड घालून मिसळून घ्या.
  3. त्यावर सोडा घालून सगळं चांगलं फेटून घ्या.
  4. आता सर्व पीठ एका तेल लावलेल्या भांड्यात घालून, दुसऱ्या एका तसराळ्यात पाणी घालून (वर व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे) त्यात वाफवायला ठेवा.
  5. १५ मिनिटांसाठी, वर झाकण ठेऊन वाफवायला ठेवा.
  6. ढोकळ्याला वाफ येईपर्यंत एका छोट्या कढईत १ & १/२ टीस्पून तेल घालून त्यात मोहरी घाला.
  7. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व तीळ घाला.
  8. तीळ किंचित ब्राउन होईपर्यंत परतून घ्या व मग गॅस बंद करा.
  9. ही फोडणी पूर्ण गार व्हायला ठेऊन द्या.
  10. १५ मिनिटं वाफ आल्यावर ढोकल्याच्या पिठात एक टूथपिक घालून तपासून पहा.
  11. जर टूथ पिक कोरडी बाहेर आली तर गॅस बंद करा नाहीतर आणखीन थोड्यावेळ वाफवून घ्या.
  12. आता ढोकळ्याचं भांडं बाहेर काढून घ्या व पूर्ण गार होऊ द्या.
  13. गार झाल्यावर कडेने सोडवून घ्या व चौकोनी ढोकळा कापून घ्या.
  14. ढोकळा बाहेर काढून घ्या व त्यावर गार झालेली फोडणी थोडी थोडी पसरून घाला.
  15. खमंग इडलीचा ढोकळा कोथिंबिरीच्या किंवा एखाद्या साउथ इंडियन चटणीबरोबर खायला द्या.
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Pinterest

You may also like

kadbu
View Recipe

कडबू रेसिपी

30 min
पाकतल्या पुऱ्या रेसिपी
View Recipe

पाकतल्या पुऱ्या

30 min
गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी
View Recipe

गव्हाची (दलियाची) खीर रेसिपी

30 min

Post navigation

← वऱ्याचे तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी रेसिपी
बटाटा व फ्लॉवर ची भाजी रेसिपी →

Popular

मिक्स व्हेज परोठा रेसिपी

रगडा पॅटिस

आल्याची वडी (आलेपाक)

समोसा रेसिपी

कचोरी

About Author Uma Abhyankar View all posts

About

This site is about how strong family values, preserving and respecting different cultures can lead to a strong understanding within the society that can lead to a peaceful and prosperous world. Food is an important aspect of any culture. This is an attempt to capture all our family recipes and pass them on to the next generation. Occasionally I do write articles and poems.

Archives

  • एप्रिल 2023
  • मे 2022
  • फेब्रुवारी 2022
  • जानेवारी 2022
  • ऑक्टोबर 2021
  • जून 2021
  • मे 2021
  • एप्रिल 2021
  • मार्च 2021
  • डिसेंबर 2020
  • ऑक्टोबर 2020
  • मे 2020
  • एप्रिल 2020
  • फेब्रुवारी 2020
  • जानेवारी 2020
  • ऑगस्ट 2019
  • जुलै 2019
  • मे 2019
  • एप्रिल 2019
  • जानेवारी 2019
  • मे 2018
  • एप्रिल 2018
  • मार्च 2018
  • फेब्रुवारी 2018
  • जानेवारी 2018
  • डिसेंबर 2017
  • नोव्हेंबर 2017
  • ऑक्टोबर 2017
  • सप्टेंबर 2017
  • जून 2017
  • मे 2017
  • एप्रिल 2017
  • मार्च 2017
  • फेब्रुवारी 2017

Menu

  • Home
  • Snacks
  • Veggies
  • Breads
  • Dessert
  • Marathi
  • About

Recent Posts

  • झटपट गोड चटणी रेसिपी
  • दिंड रेसिपी
  • गाजराची चटणी रेसिपी
  • कडबू रेसिपी
  • पाकतल्या पुऱ्या
© 2015 Uma Abhyankar. All Rights Reserved.