- Serving: २०-२५ लाडू
डिंकाचे लाडू
डिंकाचे लाडू लाडवांमधले एक खूपच पौष्टिक प्रकारचे लाडू आहेत. डिंक म्हणजेच edible gum शरीरात उष्णता उत्पन्न करतो. म्हणून हे लाडू जास्त करून थंडीच्या दिवसात बनवले जातात. शिवाय २-३ महिन्यांपर्यंत सुद्धा हे लाडू चांगले टिकतात.
Ingredients
- डिंकाचे छोटे छोटे क्रिस्टल्स - १/२ कप
- किसलेले आणि भाजलेले खोबरे - १ कप
- खारीक पावडर - १/२ कप
- भरड दळलेले बदाम - १/२ कप
- खसखस - १/४ कप
- जायफळ - १/४ जायफळ किसलेले
- गूळ - अंदाजे २ कप
- तूप - अंदाजे १/२ कप
- दूध - २ टेबलस्पून
- वेलदोड्याची पूड - आवडीनुसार
Instructions
- एका तसराळ्यात भाजलेले खोबरे, खारीक पावडर, बदाम पावडर, खसखस, आणि जायफळ मिसळून घ्या.
- एका कढईत तूप गरम करून त्यात थोडा थोडा डिंक घालून, मध्यम आचेवर सगळा डिंक तळून घ्या. तळल्यावर डिंक छान फुलून येईल आणि कुरकुरीत होईल.
- तळलेला डिंक एका ताठलीत काढून हाताने किंचित कुस्करून घ्या.
- कृतिक्रमांक १ मधील तसराळ्यात सगळा कुस्करलेला डिंक घाला.
- आता कढईत गूळ घालून त्यात दूध घाला.
- मंद आचेवर सगळा गूळ विरघळू द्या.
- गूळ विरघळून जेंव्हा फेस होऊ लागेल तेंव्हा गॅस बंद करा.
- आता कढई खाली उतरवून त्यात वेलदोड्याची पूड घालून मिसळून घ्या.
- आता हा गूळ, कृतिक्रमांक ४ मध्ये सांगितलेल्या तसराळ्यात मिसळा.
- आता हे सर्व मिश्रण प्रथम चमच्याने व मग हाताने मिसळून घ्या व पूर्ण गार व्हायच्या आत हाताने वळून लाडू बनवा.