- Serving: ५ जणांसाठी
आम्रखंड
आम्रखंड म्हणजेच आंब्याच्या स्वादाचे श्रीखंड! आम्रखंड बनवायची कृति अगदी सोपी आहे. शिवाय यासाठी लागणारा आंब्याचा रस तुम्ही कॅन मधला किंवा ताजा ही वापरू शकता. गुढी पाडव्याला व दसऱ्याला बनवले जाणारे हे महाराष्ट्रीय पक्वान्न घरी जरूर बनवून पहा. आपल्याला नक्की आवडेल.
Ingredients
- दही - ४ कप
- आंब्याचा रस - ३ टेबलस्पून ताजा किंवा कॅन मधला
- साखर - चक्क्याच्या पाऊण पटीने (खालील कृति पहा)
Instructions
- ४ कप दही एका स्वच्छ कापडात घट्ट बांधून टांगून ठेवावे.
- ४-५ तासांत हळू हळू त्यातील पाणी निघून जाईल.
- पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या दह्याखाली पातेले ठेवावे.
- ७-८ तासांनंतर, कापडातले दही, म्हणजेच 'चक्का' बाहेर काढून मोजून घ्यावे.
- चक्क्याच्या पाऊणपट साखर त्यात घालावी व साखर विरघळेपर्यंत चांगले हलवावे.
- त्यात आंब्याचा रस घालावा व पुन्हा मिसळून घ्यावे.
- आता पुरणयंत्रातून किंवा एका बारीक भोकाच्या गाळण्यातून सर्व गाळून घ्यावे.
- तयार आम्रखंड वाढायच्या वेळेपर्यंत फ्रीज मध्ये ठेवावे.