बेबी पोटॅटो
बेबी पोटॅटोंनी बनलेली ही रेसिपी दिसायला खूपच आकर्षक व खायला ही चवदार आहे. ह्या साठी लागणारे छोटे छोटे बटाटे कोणत्याही रंगाचे - गुलाबी, पांढरे, किंवा जांभळे - असले तरी चालतील. ह्या बटाट्यांची सालं अगदी पातळ असतात व हे लवकर शिजतात. ह्यांना उकडून सालासकट वापरले तरी चालते. खाली दिल्याप्रमाणे हे खमंग बेबी पोटॅटोस appetizer किंवा नाश्त्यासाठी म्हणून खावयास द्यावेत.
Ingredients
- बेबी पोटैटो - १०
- तेल - १ & १/२ टेबलस्पून
- डाळीचे पीठ / बेसन - २ & १/२ टेबलस्पून
- धन्याची पूड - १/२ टीस्पून
- जिऱ्याची पूड - १/२ टीस्पून
- मिरपूड - १/४ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - १/४ टीस्पून किंवा स्वादानुसार
- कोथिंबीर - सजावटी साठी
Instructions
- सगळे बेबी पोटॅटो धुऊन उकळत्या पाण्यात टाका.
- १० मिनिटे उकळत्या पाण्यात शिजू द्या.
- चाळणीत काढून सगळे पाणी काढून टाका.
- आता वाहत्या गार पाण्याखाली एक मिनिट ठेवा. त्यामुळे ह्यांची सालं पटकन निघतील.
- सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात सालं काढलेले बटाटे घाला.
- सगळे बटाटे बाहेरून ब्राउन होईपर्यंत परता.
- आता त्यात बेसन, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, मिरपूड, मीठ, आणि तिखट घाला.
- सगळे मिसळून परत २-३ मिनिटे त्यांचा रंग डार्क ब्राउन होईपर्यंत परता.
- गॅस बंद करून गरम गरम बेबी पोटॅटोस खावयास द्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ही सजावटीसाठी पसरा.