- Serving: ३-४ जणांसाठी
भोपळ्याची भाजी
लाल भोपळा तब्बेतीसाठी खूपच पौष्टीक असतो. याने आपल्याला अत्यंत आवश्यक असे व्हिटॅमिन, व्हिटॅमिन ए मिळतं. ह्या रेसिपी मध्ये खसखस आणि खोबरे वापरले आहे जे ह्या भाजीला खूपच छान चव देतात. ह्यात वापरला जाणारा काळा मसाला ही घरी बनवायला अगदी सोपा आहे व आधी पासून तयार करून ठेवता येतो.
Ingredients
- लाल भोपळा - २ कप, सालं काढून अंदाजे १ इंच मोठ्या भोपळ्याच्या फोडी
- तेल - २ टीस्पून
- मोहरी - १/४ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- मेथी दाणे - १/४ टीस्पून
- किसलेले खोबरे - २ टीस्पून
- खसखस - २ टीस्पून
- लाल तिखट - १/२ टीस्पून किंवा स्वादानुसार
- मीठ - स्वादानुसार
- काळा / गोडा मसाला - १ टीस्पून
- गूळ - १ टेबलस्पून
- कोथिंबीर (ऐच्छिक) - सजावटी साठी
Instructions
- एका कढईमध्ये खसखस व खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्या व मिक्सर मध्ये बारीक वाटून बाजूला काढून ठेवा.
- त्याच कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, मेथी व भोपळ्याचे तुकडे घालून चांगले हालवून घ्या.
- त्यात मीठ, तिखट, काळा मसाला, गूळ आणि कृतिक्रमांक १ मध्ये बाजूला ठेवलेले खोबरे-खसखस घालून मिसळा.
- २-३ मिनिटे परतल्यावर त्यात १/२ -३/४ कप पाणी घाला.
- आता झाकण ठेवून भोपळा शिजवून घ्या आणि मग गॅस बंद करा.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही खमंग भोपळ्याची भाजी पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर वाढा.