- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 30 minutes
अळू वडी रेसिपी
अळूच्या पानांपासून बनविलेली ही वडी, म्हणजे अळू वडी हा महाराष्ट्रातील एक आवडता पदार्थ आहे. जास्त करून जेवणात साइड डिश म्हणून खाल्ली जाणारी ही वडी घरी बनवायला अगदी सोपी आहे.
Ingredients
- अळूची पाने - ६-८ स्वच्छ धुतलेली
- बेसन किंवा डाळीचे पीठ - पाउण कप
- जिऱ्याची पूड - २ टीस्पून
- धन्याची पूड - २ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- हिंग - १/४ टीस्पून
- सोडियम बायकार्बनेट किंवा खायचा सोडा - १/४ टीस्पून
- चिंचेचा कोळ - २ & १/२ टीस्पून
- गूळ - २ टेबलस्पून
- तेल - तळण्यासाठी किंवा स्टर-फ्राय करण्यासाठी
- ताजे खवलेले खोबरे - वरून सजावटी साठी
- कोथिंबीर - वरून सजावटीसाठी
- स्टर-फ़्राय करण्यासाठी
- तेल - ३ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- तीळ - १ टीस्पून
- ताजे खवलेले खोबरे (ऐच्छिक) - वरून सजावटीसाठी
- कोथिंबीर - वरून सजावटीसाठी
Instructions
- डाळीच्या पिठात धन्याची पूड, जिऱ्याची पूड, मीठ, तिखट, चिंचेचा कोळ, हिंग, गूळ आणि सोडा मिसळून घ्या.
- आता हळू हळू पाणी घालत त्याची दाट पेस्ट बनवून घ्या. (भज्याच्या पिठाप्रमाणे ही पेस्ट दाट असावी.) ही तयार पेस्ट / मसाला जरावेळ बाजूला ठेवा.
- आता अळूचे पाने दुमडायच्या दोन पद्धती आहेत -
- पहिली पद्धत - एक पान उलटे ठेवून त्यावर सगळीकडे वर तयार केलीली पेस्ट / मसाला लावून घ्या. त्यावर दुसरे पान ठेऊन त्यावरही मसाला लावा. अश्याप्रकारे ४ पाने एकावर एक ठेऊन त्याची घट्ट गुंडाळी करा.
- दुसरी पद्धत - ह्या पद्धतीत वरील प्रमाणेच पण फक्त २ पाने एकावर एक ठेवा पण गुंडाळी करताना प्रत्येकवेळी दुमडल्यावर ही त्यावर मसाला लावा. व अश्याप्रकारे ह्या पद्धतीत थोडी चपटी गुंडाळी होईल.
- वरील कोणत्याही पद्धतीने पानांची गुंडाळी केल्यावर ही गुंडाळी प्रेशर कुकर मध्ये १५-२० मिनिटे वाफवून घ्या. (कुकर वर प्रेशर ठेवू नका)
- वाफवून झाल्यावर गुंडाळी गार होऊ द्या.
- आता जर ४ पानांची गुंडाळी केली असेल तर त्याच्या साधारण १/२-१ से. मी. रुंद वड्या कापून घ्या. आणि जर २ पानांची गुंडाळी असेल तर त्याच्या साधारण १ - १/२ इंच मोठ्या वड्या कापून घ्या.
- आता किंचित गुलाबी रंगांच्या होईपर्यंत तळून घ्या. तळून झाल्यावर एका पेपर टॉवेल वर काढा.
- वरून खोबरे / कोथिंबीर घालून गरम अळू वडी वाढा.
स्टर-फ्राय करण्यासाठी - (४ पानांची गुंडाळीच स्टर -फ्राय करावी.)
- स्टर-फ़्राय साठी कढईत थोडे तेल घालून त्यावर मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, व तीळ घाला व बारीक गॅस वर परता.
- तीळ गुलाबी झाल्यावर त्यात उकडलेल्या अळू वड्या घाला व हलकेच सर्व मिसळून घ्या.
- कडेने वड्या ब्राउन दिसायला लागल्यावर गॅस बंद करा.
- सजावटी साठी वरून खोबरे / कोथिंबीर घालून गरम गरम अळू वड्या वाढा.