- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 10 minutes
आंब्याची डाळ
आंब्याची डाळ हा कैरीच्या दिवसांत विशेषतः चैत्र महिन्यात हळदीकुंकवाला बनविला जाणारा खास पदार्थ आहे. हरभऱ्याची डाळ आणि कैरी पासून बनविली जाणारी ही आंब्याची डाळ व थंडगार पन्हे हा तर ह्या दिवसांतील खास मेनू असतो. मात्र पचायला जड असल्यामुळे ही थोड्या प्रमाणातच एका वेळी खावी.
Ingredients
- हरभऱ्याची डाळ - १ कप
- हिरव्या मिरच्या - ५-६
- साखर - १ & १/२ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- कैरी - १ छोटी साल काढून किसलेली
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेली
- तेल - २ टेबलस्पून
- मोहरी - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- कढिलिंब - ८-१०
- लाल वाळलेल्या मिरच्या - २
Instructions
- हरभऱ्याची डाळ ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी.
- मग सगळे पाणी ओतून टाकावे व डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी.
- त्यात हिरव्या मिरच्या घालून डाळ थोडीशी भरड वाटून घ्यावी. (ह्यासाठी फूड प्रोसेसर वापरल्यास जास्त चांगले. नसल्यास साधा मिक्सर वापरला तरी चालेल.) वाटताना आवश्यक तेवढेच पाणी घालावे.
- आता वाटलेल्या डाळीत कैरी, मीठ, साखर, व कोथिंबीर घालावी व सर्व मिसळून घ्यावे.
- फोडणीसाठी तेल तापत ठेवावे. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, काढिलिंब, व लाल मिरच्या घालाव्यात.
- थोडे परतून गॅस बंद करावा व फोडणी गार होऊ द्यावी.
- गार झालेली फोडणी डाळीवर घालावी.
- सर्व चांगले मिसळावे व खमंग आंब्याची डाळ थंडगार पन्ह्याबरोबर द्यावी.