बटाट्याचा कीस
बटाट्याचा कीस हा उपासाच्या दिवशी बनवायचा अगदी झटपट पदार्थ आहे. ह्याला लागणारे दाण्याचे कूट कोणत्याही महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरात बहुतेक तयारच असते किंवा आधीपासून तयार ठेवता येते. ह्याच प्रमाणे रताळ्याचा कीस ही करता येतो. दोन्ही प्रकारचे कीस उपासाला छान लागतात.
Ingredients
- किसलेले बटाटे - २ कप
- तेल किंवा तूप - २ टेबलस्पून
- जिरे - १/२ टेबलस्पून
- दाण्याचे कूट - १ & १/४ कप
- मीठ - स्वादानुसार
- साखर - १ टीस्पून
- लिंबाचा रस - १ टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या - २ बारीक चिरलेल्या / ठेचलेल्या
- कोथिंबीर - बारीक चिरलेली, सजावटीसाठी
Instructions
- बटाट्याचा कीस १५-२० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
- मग पाणी काढून टाकायला एका चाळणीत काढा.
- एका कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे घाला.
- मग त्यातच कीस घालून सर्व मिसळून घ्या.
- आता झाकून २ मिनिटे शिजू द्या.
- २ मिनिटांनी परत एकादा हलवून आणखीन २ मिनिटे शिजू द्या.
- त्यात दाण्याचे कूट, मीठ, मिरच्या, साखर, आणि लिंबाचा रस घालून मिसळून घ्या.
- झाकून पुन्हा ५-७ मिनिटे शिजू द्या. पण मधे मधे १-२ वेळा हलवायला विसरू नका.
- आता बटाट्याचा कीस चांगला शिजेल व त्याचा रंग ही बदललेला दिसेल. मग गॅस बंद करा.
- वरून कोथिंबीर पसरा व हा खमंग बटाट्याचा कीस वाढा.