मसाला पीनट्स
मसाला पीनट्स म्हणजेच तिखट आणि चटपटीत शेंगदाणे! डाळीच्या पिठात घोळून तळलेले हे शेंगदाणे चहा बरोबर खायला खूपच चविष्ट लागतात. घरी नक्की बनवून पहा व आपला अभिप्राय कळवा.
Ingredients
- शेंगदाणे - १/२ कप
- डाळीचे पीठ / बेसन - ३ टेबलस्पून
- तांदुळाची पिठी - १ टेबलस्पून
- लाल तिखट - १ & १/२ टीस्पून
- मीठ - अंदाजे १/२ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- आमचूर - १/२ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- चाट मसाला - २ टीस्पून
- खायचा सोडा - १/४ टीस्पून
- तेल - तळण्यासाठी
Instructions
- बेसन, तांदुळाची पिठी, मीठ, तिखट, आमचूर, चाट मसाला, हळद व खायचा सोडा, हे सर्व एका बाउल मधे मिसळून घ्या व हा तयार मसाला थोड्यावेळ बाजूला ठेवा.
- एका कढईत दाणे मध्यम आचेवर साधारण ५ मिनिटे, छोटे छोटे काळे डाग दिसेपर्यंत भाजून घ्या.
- भाजलेले दाणे पूर्ण गार होऊ द्या.
- दाणे गार झाल्यावर एका वेगळ्या बाउल मधे घेऊन त्यांवर १ टीस्पून पाणी घाला व हलवून सगळे दाणे ओलसर करून घ्या.
- आता कृतिक्रमांक १ मधे बाजूला ठेवलेल्या मसाल्यातला अर्धा मसाला ओल्या दाण्यांवर घाला व मिसळून घ्या. ह्यामुळे मसाला दाण्यांवर चिकटेल.
- आता दाण्यावर १/२ टीस्पून पाणी परत घाला व आता उरलेला मसालाही त्यावर घाला.
- सगळा मसाला दाण्यांवर चिकटेपर्यंत मिसळा. (वाटल्यास आणखीन १/२ टीस्पून पाणी घालून परत मिसळून घ्या.)
- कढईत तळण्यासाठी तेल गरम करून त्यात १ दाणा घालून बघा. जर तो तरंगून वर आला तर तेल योग्य तापले आहे.
- आता सगळे दाणे छोट्या छोट्या बॅचेस मध्ये तेलात घालून, हलके ब्राउन रंगांचे होईपर्यंत तळून घ्या.
- तळून झाल्यावर एका पेपर टॉवेल वर काढा.
- पूर्ण गार झाल्यावर मसाला पीनट्स एका एअर टाइट डब्यात भरून ठेवा.