- Serving: साधारण ५० आप्प्यांसाठी
आप्पे
आप्पे किंवा अप्पम् एक प्रसिद्ध, पौष्टिक, व चविष्ट साउथ इंडियन स्नैक आहे. ह्या रेसिपी मध्ये मी पांढरे तांदूळ व ओट वापरले आहेत पण त्या ऐवजी तुम्ही नुसते पांढरे तांदूळ किंवा पांढरे व ब्राऊन तांदूळ अर्धे अर्धे ही वापरू शकता. तांदूळ व उडदाच्या डाळीचे प्रमाण मात्र ३:१ असे असावे. अप्पे कोणत्याही कोरड्या चटणीबरोबर (जशी मोळगापोडी) किंवा ओल्या चटणीबरोबर (जसे कोथिंबीरीची चटणी किंवा टोमॅटोची चटणी बरोबर) वाढावेत.
Ingredients
- तांदूळ - ३/४ कप
- ओट - ३/४ कप
- उडदाची डाळ - १/२ कप
- पोहे - १/४ कप
- मेथी दाणे - १ & १/२ टीस्पून
- कांदा - १ छोटा बारीक चिरलेला
- हिरवी मिर्ची - बारीक चिरलेली, चवीप्रमाणे
- मीठ - चवीनुसार
- ताजे खवलेले ओले खोबरे - १/३ कप
- आल्याची पेस्ट किंवा किसलेले आले - १ टेबलस्पून
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेली
Instructions
- तांदूळ, ओट, व पोहे ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- त्याच वेळी दुसऱ्या पातेल्यात उडदाची डाळ व मेथीच्या दाण्यांना पण पाण्यात भिजवून ठेवा.
- ५-६ तास भिजल्यानंतर, वरचे पाणी बाजूला काढून घ्या व तांदूळ व ओट मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. (वाटताना लागेल तेव्हढेच, बाजूला काढून ठेवलेले पाणी वापरा. )
- त्याच प्रमाणे उडदाची डाळ व मेथी ही, जास्तीचे पाणी बाजूला काढून व लागेल तेव्हढेच पाणी वापरून, बारीक वाटून घ्या.
- आता सर्व वाटण एकत्र करा व एका उंच पातेल्यात मिसळून घ्या. व ८-१० तास हे पीठ फेरमेंटशन साठी उन्हात किंवा कोणत्याही उबदार ठिकाणी झाकून ठेवून द्या.
- फर्मेंटेशन चांगले झाल्यावर हे पीठ फुगून वर येईल.
- आता त्यात मीठ, कांदा, ओले खोबरे, कोथिंबीर, व मिर्ची घालून मिसळून घ्या.
- आता थोडे थोडे पीठ आप्पे पात्रात घालून झाकून शिजू द्या.
- वरून आप्पे शिजलेले दिसायला लागले की सगळे आप्पे उलटून टाका व खालच्या बाजूनेही एखादा मिनिट शिजू द्या.
- तयार आप्पे काढून घ्या व उरलेल्या सर्व पिठाचे असेच आप्पे तयार करून घ्या.
- गरम गरम आप्पे मोळगापोडी, कोथिंबिरीची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा कोणत्याही इतर आवडीच्या चटणी बरोबर वाढा.