- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
गुळांबा
कैरीच्या दिवसांत आणि उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणातील मनपसंत तोंडीलावणे म्हणजे कैरीचा गुळांबा. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा हा गुळांबा बनवायला अगदी सोपा आहे व फ्रीज मध्ये बरेच महिने टिकू शकतो.
Ingredients
Instructions
- कैरी किसून घ्या किंवा कैरीचे छोटे तुकडे करून घ्या. किसून घेतल्यास साल काढून टाका पण तुकडे केल्यास साल ठेवायला हरकत नाही. किसण्यासाठी मी फूड प्रोसेसर चा वापर करते कारण त्यामुळे कैरीचा मोठा व जाडजाड कीस पडतो, जो तयार गुळांब्यामधे छान दिसतो व लागतो. पण किसणीने किसल्यास शक्यतो मोठ्या भोकांची किसणी वापरावी.
- कीस मोजून घ्यावा व आंबटपणासाठी चाखून बघावा.
- कमी आंबट असल्यास कैरीइतकाच आणि भरपूर आंबट असल्यास कैरीच्या दीडपट गूळ किसलेल्या कैरीत घालावा.
- बारीक आचेवर वरचेवर हालवत, सगळे पाणी अटेपर्यंत व गूळ विरघळेपर्यंत गुळांबा शिजवावा. गार झाल्यावर गुळांबा आणखीन थोडा घट्टच होईल हे लक्षात ठेऊन शिजवावे.
- वाढताना त्यावर थोडे तूप घालावे व पोळी बरोबर वाढावे.
- हा गुळांबा फ्रीज मध्ये बरेच महिने टिकू शकतो.