- Prep Time: 5 minutes
- Cook Time: 10 minutes
टोमॅटोची चटणी रेसिपी
ही चविष्ट टोमॅटोची चटणी इडली वडा, डोसा, उत्तपम, किंवा सॅन्डवीच व परोठ्याबरोबर फारच सुरेख लागते. नक्की बनवून बघा. आपल्याला खूप आवडेल.
Ingredients
- टोमॅटो - ४
- उडदाची डाळ - २ टीस्पून
- हरभऱ्याची डाळ - २ टीस्पून
- तीळ - २ टीस्पून
- कढिलिंब - १५-२०
- लाल मिर्ची - २
- मीठ - स्वादानुसार
- गूळ - २ टीस्पून
Instructions
- टोमॅटो कापून मोठे तुकडे करून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, आणि तीळ घालून सर्व गुलाबी रांगांचे होईपर्यंत तळून घ्या.
- आता त्यावर लाल मिर्ची, आणि कढीलिंब घाला. तडतडल्यावर त्यात टोमॅटोचे तुकडे घाला.
- टोमॅटो मऊ होईपर्यंत २ मिनिटे परता.
- आता मीठ व गूळ घाला आणि मिसळून घ्या.
- गॅस बंद करून थोडे गार होऊ द्या. मग मिक्सर वर बारीक वाटून घ्या.
- आता ही खमंग टोमॅटोची चटणी मुगाचा डोसा, उत्तप्पा, अडई, परोठे, किंवा धिराड्याबरोबर वाढा.