- Serving: ५ जणांसाठी
मुगाच्या डाळीचा डोसा
मुगाच्या डाळीचा डोसा एक खूपच सोपा व झटपट बनवायचा डोसा आहे. रात्री डाळ भिजवली की सकाळी अगदी पटकन हा चविष्ट व पौष्टिक डोसा बनवता येतो. हा डोसा कोथिंबिरीच्या किंवा टोमॅटोच्या चटणी बरोबर किंवा थोडे तेल घालून मोळगापोडी बरोबर खायला खूपच छान लागतो.
Ingredients
- मुगाची डाळ - ३/४ कप
- आलं - १ इंच मोठा तुकडा
- लसूण - २-३ मोठ्या पाकळ्या
- मीठ - स्वादानुसार
- हिरवी मिर्ची - २-३ किंवा स्वादानुसार
- हळद - १/४ टीस्पून
- तेल - आवश्यकतेनुसार
Instructions
- मुगाची डाळ कमीतकमी ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- ५-६ तासांनंतर सगळे पाणी काढून टाका व त्यात आलं, लसूण, मिर्ची, व मीठ घाला.
- आता सर्व मिक्सर मध्ये घालून अगदी बारीक वाटून घ्या. (गरज वाटल्यास वाटताना पाणी घाला.) आता हळद घालून पीठ मिसळून घ्या.
- तवा गरम करून त्याच्या मधोमध २-३ टेबलस्पून पीठ घालून ते चमच्याच्या मागील बाजूने किंवा पळीने हळूहळू व गोलगोल फिरवून पातळ डोसा पसरून घ्या.
- १/२ टीस्पून तेल डोस्याच्या कडेने सोडा.
- मध्यम आचेवर डोसा सोनेरी रंगाचा होईपर्यंत शिजू द्या.
- आता उलत्याने हळूच सोडवून घ्या व डोस्याची गुंडाळी करा.
- गरम गरम मुगाच्या डाळीचा डोसा कोथिंबिरीची चटणी, टोमॅटोची चटणी, किंवा मोळगापोडी बरोबर वाढा.