- Serving: अंदाजे १५ लाडू
मेथीचे लाडू रेसिपी
मेथीचे लाडू हे खूपच पौष्टिक प्रकारचे लाडू आहेत जे थोड्या थोड्या प्रमाणात जर रोज खाल्ले तर आरोग्यास खूप लाभदायक असतात. मात्र मेथी पित्तकारक असल्यामुळे हे लाडू खायचे प्रमाण सुरवातीस कमी आणि मग हळू हळू वाढवायला हरकत नाही. आणि म्हणूनच ह्या लाडवांचा आकारही छोटाच ठेवला जातो. जास्त करून थंडीच्या दिवसांत हे लाडू तब्बेतीस खूपच लाभदायक असतात.
Ingredients
- मेथी दाणे - 3/4 टेबलस्पून
- तूप - २ टेबलस्पून मेथी भिजवायला व ३ टेबलस्पून कणीक भाजायला
- कणीक - ३/४ कप
- खायचा डिंक - १ & १ /२ टेबलस्पून
- खसखस - ३/४ टेबलस्पून
- सुके खोबरे - १ & १/२ टेबलस्पून किसलेले
- खारीक पावडर - १ & १/२ टेबलस्पून
- तीळ - २ टीस्पून
- बदामाची पावडर किंवा बदामाचे काप - १/२ टेबलस्पून
- पिठीसाखर - ३/४ कप
Instructions
- मेथी दाणे गुलाबी रंगावर भाजून घ्या.
- आणि मग त्याची भरड पूड करून घ्या.
- २ टेबलस्पून तूप गरम करून मेथीच्या पावडर वर ओता. मेथी पावडर पूर्ण पणे तुपात बुडून थोडे तूप वर राहिले पाहिजे.
- अशा प्रकारे मेथी पावडर संपूर्ण ३ दिवस (७२ तास) तुपात भिजत ठेवा.
- चौथ्या दिवशी खसखस, खोबरे, आणि तीळ वेगवेगळे गुलाबी रंगावर भाजून घ्या आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढा.
- खायचा डिंक ही कोरडाच भाजून व फुलवून घ्या आणि तो सुद्धा वरील मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या.
- मिक्सर मधील सर्व सामग्री किंचित दळून घ्या व थोड्यावेळ बाजूला ठेवा.
- ३ टेबलस्पून तूप गरम करून त्यात कणीक गडद रंगाची होईपर्यंत भाजून घ्या व एका तसाराळ्यात काढा.
- आता मिक्सर मधील सर्व सामग्रीही तसाराळ्यात काढून घ्या.
- आता त्यात भिजविलेली मेथी पावडर, खारीक पावडर, पिठीसाखर, व बदामाची पावडर घाला.
- सर्व मिसळून हाताने चांगले मळून घ्या.
- आता वरील मिश्रणाचे छोटे छोटे (अंदाजे १ इंच मोठे) लाडू वळून घ्या. (जर वरील मिश्रण कोरडे वाटले व लाडू वळताना त्रास होत असेल, तर वरून थोडे तूप घालून परत मळून घ्या व मग लाडू वळा.)