- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 20 minutes
लिंबाचे उपासाचे लोणचे रेसिपी
लिंबाच्या ह्या उपासाच्या लोणच्याला गोड लोणचे असेही म्हणतात. हे लोणचे कोणत्याही उपासाच्या पदार्थांबरोबर जसे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे किंवा उपासाचे थालीपीठ, वऱ्याचे तांदूळ वगैरे पदार्थांसाठी अगदी योग्य तोंडीलावणे आहे. हे लोणचे वर्षभर सुद्धा टिकते.
Ingredients
- लिंबं - १२ छोटी किंवा ६ मोठी
- मीठ - लिंबाच्या फोडींच्या १/५ भागाएवढे
- साखर - ३ कप
- लाल तिखट - आवडीप्रमाणे
Instructions
- सगळी लिंबं स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करावीत.
- सर्व लिंबांच्या अंदाजे १ इंच मोठ्या फोडी कराव्यात .
- फोडीचे ५ समान भाग करून घ्यावेत. आणि त्यातील एका भागाएवढे मीठ मोजून फोडींवर घालावे.
- सर्व मिसळून ५ दिवस फोडी मुरत ठेवाव्यात.
- ५ दिवसांनंतर खाली दिल्याप्रमाणे साखरेचा पाक करावा.
- एका पातेल्यात साखर घेऊन ती बुडेपर्यंत पाणी घालावे व सतत हलवत उकळी येऊ द्यावी.
- गॅस मध्यम आचेवर ठेऊन ५-६ मिनिटे तसेच उकळू द्यावे. मधे मधे पाक बोटांमध्ये घेऊन त्याची गोळी बनवता येते का ते तपासून बघावे.(ह्याला गोळीबंद पाक असे म्हणतात.) असे झाल्यावर गॅस बंद करावा.
- आता पाकामध्ये सर्व मुरलेल्या फोडी घालाव्यात.
- आवडीप्रमाणे लाल तिखट घालावे. आणि परत एकदा उकळी आणावी.
- गार झाल्यावर तयार उपासाचे लोणचे बरणीत भरून ठेवावे.