- Serving: अंदाजे १३ कटलेट्स
व्हेजिटेबल कटलेट
व्हेजिटेबल कटलेट ची ही रेसिपी घरी बनवायला अगदीच सोपी आहे. हे एक मस्त स्नॅक आहे जे चहाबरोबर किंवा नाष्ट्याला खायला खूपच चविष्ट लागते. हे कटलेट्स तुम्ही बर्गर मध्ये veggie patty म्हणून ही वापरू शकता.
Ingredients
- बटाटे - २ कप; उकडून सालं काढून बारीक चिरलेले
- गाजर - ३/४ कप छोटे चौकोनी तुकडे केलेले
- मटार - १/२ कप
- फरसबीच्या शेंगा - १/२ कप बारीक चिरलेल्या
- तेल - २ टीस्पून आणि तळण्यासाठी
- कांदा - १ छोटा बारीक चिरलेला
- आलं - १ इंच मोठा तुकडा किसून
- हिरवी मिर्ची - २ मध्यम आकाराच्या ठेचलेल्या
- गरम मसाला - १ & १/२ टीस्पून
- ब्रेड स्लाइस - १
- आमचूर - १ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
- मैदा - ४ टेबलस्पून
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेली
Instructions
- उकडलेले बटाटे एका बाउल मध्ये काढून घ्या.
- गाजर, मटार आणि शेंगा एका माइक्रोवेव सेफ बाउल मध्ये काढून त्यात १/२ कप पाणी घाला.
- आता ५-६ मिनिटे माइक्रोवेव मध्ये हे सर्व शिजवून घ्या.
- आता ह्या शिजवलेल्या सर्व भाज्या थोड्या कुस्करून / ठेचून घ्या.
. - एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात कांदा, आलं, आणि हिरवी मिर्ची घाला.
- त्यातच गरम मसाला घालून एखादा मिनिट परतून घ्या व गॅस बंद करा.
- आता उकडलेल्या व कुस्करलेल्या सर्व भाज्या त्यात घालून मिसळून घ्या. व आता हे सगळे मिश्रण कृतिक्रमांक १ मध्ये बाजूला ठेवलेल्या बटाट्यात मिसळा.
- त्यात मीठ, व आमचूर घालून हाताने थोडे कुस्करत चांगले मिसळून घ्या.
- ब्रेड ची स्लाइस थोड्या पाण्यात बुडवून पिळून घ्या व टी ही वरील सारणात घाला. त्यातच चिरलेली कोथिंबीर ही घाला व सर्व मिसळून घ्या.
. - आता ह्या सारणाचे साधारण १/२ इंच जाड, गोल किंवा अंडकार कटलेट्स बनवून घ्या.
- आता मैद्यात ८ टेबलस्पून पाणी घालून गाठी न ठेवता मिसळून घ्या.
- आता एक एक करून सगळे कटलेट्स मैद्याच्या पाण्यात बुडवून गरम तेलात तळून घ्या.
- सोनेरी ब्राउन रंगाचे झाल्यावर पेपर टॉवल वर काढा.
. - गरमागरम कटलेट्स केचप किंवा कोणत्याही हिरव्या चटणीबरोबर खायला द्या.