नारळाची बर्फी रेसिपी
मऊ आणि खुटखुटीत नारळाची बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे. त्यात आवडत असल्यास थोडा आंब्याचा रस ही घातल्यास त्याला फारच सुंदर स्वाद येतो. ही नारळ बर्फी किंवा आंबा-नारळ बर्फी घरी जरूर बनवून बघा व आपल्या कंमेंट्स द्यायला विसरू नका!
Ingredients
- ओला खवलेला नारळ - १ कप
- साखर - ३/४ कप
- दूध - २ टेबलस्पून
- वेलदोड्याची पूड - आवडीनुसार
- आंब्याचा रस (ऐच्छिक) - १/४ कप (आंबा-नारळ बर्फीसाठी)
- तूप - थोडेसे पोळपाटाला व लाटण्याला लावण्यासाठी
Instructions
- नारळ, साखर, व दूध सर्व एका पातेल्यात मिसळून घ्या. (आंबा-नारळ बर्फीसाठी, त्यातच आंब्याचा रस ही घाला.)
- मध्यम आचेवर सतत हालवत शिजवा.
- त्यातील ओलसर पणा कमी होऊन गोळा होईपर्यंत शिजवा. ह्याला साधारण १० मिनिटे लागतील. (आंब्याचा रस घातल्यास साधारण १५ मिनिटे लागतील.)
- गोळा झाल्यावर त्यात थोडी वेलदोड्याची पूड घाला व मिसळून घ्या. आणि गॅस बंद करा. (आंबा-नारळ बर्फीसाठी वेलदोड्याची पूड घालू नये.)
- आता सर्व मिश्रण थोडे तूप लावलेल्या पोळपाटाच्या मध्यभागी घालून, हाताने सारखे करा व तूप लावलेल्या लाटण्याने गोल (साधारण १-२ से. मी. जाड) लाटून घ्या.
- गार झाल्यावर चौकोनी वड्या कापून घ्या.