- Prep Time: 5 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: ६ जणांसाठी
पन्हे
पन्हे किंवा पन्हं हे महाराष्ट्रात उन्हाळ्यातील एक प्रसिद्ध आणि आवडतं पेय आहे. चैत्र महिन्यात तर आंब्याची डाळ व पन्हे हा हळदीकुंकवाचा ठरलेला मेनू! पारंपारिक पद्धतीत पन्ह्यामधे स्वादासाठी वेलदोड्याची पूड घालतात पण त्याऐवजी जर थोडी जिऱ्याची पूड घातली तरीसुद्धा हे थोडे चटपटीत पन्हे खूप छान लागते.
Ingredients
- कैरी - १ मोठी
- गूळ किंवा साखर - आवश्यकतेनुसार (खालील कृति पाहावी)
- मीठ - चवीनुसार
- वेलदोड्याची पूड - एका ग्लासात एक चिमूट
- जिऱ्याची पूड (ऐच्छिक) - एका ग्लासात एक चिमूट
Instructions
- कैरी (साल काढून किंवा सालासकट) कुकर मध्ये एक शिट्टी वाजेपर्यंत शिजवून घ्या. एका शिट्टी नंतर गॅस बंद करून प्रेशर सुटल्यावर बाहेर काढा.
- गार झाल्यावर कैरीचे साल आधी काढले नसल्यास काढून घ्या. आता हाताने सगळा गर काढून घ्या.
- कैरीचा गर थोडा आंबट असल्यास गराइतकाच व भरपूर आंबट असल्यास गराच्या दीडपट गूळ त्यात घाला.
- आता मिक्सर मध्ये सगळे वाटून घ्या व हे पन्ह्याचे कॉन्सेन्ट्रेट बाठलीत भरून फ्रीज मध्ये ठेवा.
- सर्व्ह करायच्या वेळी ५-६ टेबलस्पून, किंवा आवडीप्रमाणे कमी अथवा जास्त, पन्ह्याचे कॉन्सेन्ट्रेट एका ग्लास मध्ये घालून, त्यात एक चिमूट मीठ, आणि पाऊण कप पाणी घालून हालवा. वरून वेलदोड्याची पूड (किंवा जिऱ्याची पूड) घालून थंडगार पन्हे सर्व्ह करा.