- Serving: ३-४ जणांसाठी
पातीच्या कांद्याची भाजी
पातीच्या कांद्याची भाजी ही एक अगदी सोपी भाजी आहे जी कमी वेळात आणि पटकन बनवता येते. ह्या भाजीला 'पातीच्या कांद्याची पीठ पेरून भाजी' असे ही म्हणतात. ही भाजी कोरडी असल्यामुळे ही डब्यात किंवा प्रवासाला न्यायला खूपच सोईची आहे. ह्या भाजी सोबत थोडे दही घेतल्यास ते ही छान लागते.
Ingredients
- पातीचा कांदा - २ कप बारीक चिरलेला
- तेल - १ &१/२ टेबलस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/२ टीस्पून
- हळद - १ टीस्पून
- डाळीचे पीठ / बेसन - १ कप
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - १ टीस्पून किंवा चवीनुसार
- साखर (ऐच्छिक) - २ टीस्पून
Instructions
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद व चिरलेला पातीचा कांदा घालावा.
- थोडेसे परतून त्यावर झाकण ठेवावे व ५ मिनिटे कांदा मऊ होईपर्यंत, मध्यम आचेवर शिजू द्यावे.
- त्यात मीठ, साखर, बेसन, व तिखट घालून हलवावे व परत झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे.
- गॅस बंद करून ही भाजी पोळी किंवा भाकरी बरोबर खावयास द्यावी.