- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
मिरचीचे लोणचे रेसिपी
मिरची चे लोणचे इतर कुठल्याही म्हणजे लिंबू किंवा कैरीच्या लोणाच्यापेक्षा जरा निराळे असते - चवीलाही व दिसायलाही. पण हे घरी बनवायला अगदी सोपे आहे. उकाडा जास्त असल्यास हे लोणचे फ्रीज मध्ये ठेवल्यास वर्षभर ही चांगले टिकते.
Ingredients
- हिरव्या मिरच्या - १ & १/२ कप, बारीक तुकडे केलेल्या
- तेल - कृतीत दिल्याप्रमाणे
- मेथी दाणे - १/४ टीस्पून
- हळद - २ टीस्पून
- हिंग - २ टीस्पून
- सालं काढलेली मोहरीची डाळ - २ टेबलस्पून
- मीठ - कृतिनुसार
- लिंबाचा रस (ऐच्छिक) - अंदाजे १/४ कप किंवा आवडीनुसार
Instructions
- मिरच्यांवर सगळीकडून लागेल असे तेल शिंपडून घ्या.
- एका छोट्या कढईत १/४ टीस्पून तेल गरम करून त्यावर मेथी दाणे गडद रंगाचे होईपर्यंत परतून घ्या आणि मग मिक्सर मध्ये वाटून त्यांची पूड करून घ्या.
- मेथीच्या पुडीत हळद, हिंग, मोहरीची डाळ व १/२ कप पाणी घालून सर्व बारीक वाटून घ्या.
- मिरच्यांचे एकसारखे ५ भाग करून त्यांतील एका भागाएवढे मीठ मोजून घ्या व मिरच्यांवर घाला.
- कृतिक्रमांक ३ मध्ये बनविलेले मसाल्याचे मिश्रण ही मिरच्यांवर घाला. आवडीनुसार लिंबाचा रस ही घालून सगळे मिसळून घ्या.
- आता हे तयार लोणचे बरणीत भरून ठेवा पण वापरायच्या आधी निदान ५-६ दिवस तरी मिरच्या मसाल्यामध्ये चांगल्या मुरू द्या.