रव्याचा केक रेसिपी
रव्याचा केक ही एक अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. हा केक तुम्ही कधीही स्नॅक म्हणून किंवा dessert म्हणून खाऊ शकता. ह्या केकसाठी लागणारा रवा बारीक किंवा जाड कोणताही वापरला तरी चालेल.
Ingredients
- दही - १/२ कप
- साखर - १/२ कप
- दूध - १/२ कप
- रवा - ३/४ कप
- मीठ - एक चिमूट
- लोणी - १/४ कप वितळलेले
- खायचा केशरी रंग - एखादा थेंब किंवा चिमूटभर
- टूटी-फ्रूटी किंवा बेदाणे - १५-२०
- व्हॅनिला इसेन्स - १/४ टीस्पून
- सोडियम बायकार्बनेट (खायचा सोडा) - १/४ टीस्पून
Instructions
- दही आणि साखर एका बाउल मध्ये साखर विरघळेपर्यंत मिसळून घ्या.
- त्यात दूध, रवा, टूटी-फ्रूटी किंवा बेदाणे, लोणी, खायचा रंग, व्हॅनिला इसेन्स आणि खायचा सोडा मिसळून घ्या.
- सर्व छान फेटून व मिसळून घ्या आणि तासभर तसेच झाकून ठेऊन द्या.
- तासाभरानी ओव्हन ३५० डिग्री वर तापवून, केक बेक करण्यासाठी तयार ठेवा.
- एका ओव्हन-सेफ ट्रेला आतून थोडे लोणी लाऊन घ्या व त्यात वरील (कृतिक्रमांक ३ मधील) मिश्रण ओतून घ्या.
- ओव्हन मध्ये ३०-३५ मिनिटांपर्यंत केक बेक करून घ्या.
- एक टूथ-पिक किंवा बटर-नाइफ केकच्या मधोमध घालून बघा. बाहेर काढल्यावर जर ओलसर पीठ टूथ-पिक किंवा बटर नाइफ ला चिकटले असेल तर आणखीन थोडा वेळ बेक करा. जेंव्हा टूथ-पिक किंवा बटर-नाइफ बाहेर काढल्यावर स्वच्छ असेल, म्हणजे केक झाला असे समजावे.
- अशा पद्धतीने केक पूर्ण बेक झाल्यावर ओव्हन मधून बाहेर काढा व पूर्ण गार होऊ द्या.
- मग ट्रे उलटा करून केक बाहेर काढून घ्या.
- आवडेल त्या आकारात कापून त्याचे एकसारखे काप करून रवा-केक सर्व्ह करा.