- Serving: १० मठऱ्यांसाठी
मठरी रेसिपी
संध्याकाळी चहाबरोबर खायच्या अनेक स्नॅक्सपैकी मठरी हे घरी बनविण्यासाठी एक सोपे स्नॅक आहे. ह्या रेसिपीसाठी मी इथे मैद्याचा वापर केला आहे. पण त्याऐवजी तुम्ही नुसते गव्हाचे पीठ किंवा अर्धा मैदा आणि अर्धे गव्हाचे पीठ ही वापरू शकता.
Ingredients
- मैदा - १ कप
- तेल - २ टेबलस्पून पिठासाठी व तळण्यासाठी वेगळे
- मीठ - चवीप्रमाणे
- ओवा - १/२ टीस्पून
- काळे मिरे - १०
Instructions
- मैदा, २ टेबलस्पून तेल, मीठ, व ओवा मिसळून, पाण्याने घट्ट (पुरीप्रमाणे) भिजवून घ्या. (मी १ कप मैद्यासाठी अंदाजे १/४ कप पाणी वापरले.)
- झाकून १५ मिनिटे ठेऊन द्या.
- १५ मिनिटांनी मैद्याचे एकसारखे १० भाग करून घ्या.
- प्रत्येक भाग हाताने गोल फिरवून चपटा करून घ्या.
- आता मैद्याचा एक भाग एका वेळी घेऊन त्याची पुरी लाटून घ्या.
- पुरी दोनदा दुमडून त्याचा त्रिकोणासारखा आकार करून घ्या.
- त्रिकोणाच्या मधोमध एक मिरी खोचून परत हलकेच लाटा.
- अशा पद्धतीने सर्व मैद्याच्या भागांची मठरी बनवून घ्या.
- आता तेलामध्ये मंद आचेवर, एका वेळी थोड्या मठऱ्या घालून, त्या किंचित गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. मंद आचेवरच तळा म्हणजे आतपर्यंत तळल्या जातील व मऊ पडणार नाहीत. प्रत्येक घाण्याला तळण्यासाठी निदान ८ ते १० मिनिटे लागायला हवीत.
- पूर्ण गार झाल्यावर कुरकुरीत मठऱ्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.