- Serving: ६ जणांसाठी
टोमॅटोचे सार
टोमॅटोचे सार हे एक महाराष्ट्रीय पद्धतीचे टोमॅटोचे सूपच आहे. जेवणाबरोबर विशेषतः थंडीच्या दिवसांत हे गरम गरम सार प्यायला फारच छान लागते. सूपच्या तुलनेत हे सार पातळ व थोडे गोडसर लागते.
Ingredients
- टोमॅटो - ४ & १/२ कप, टोमॅटोच्या फोडी
- तेल - १ & १/२ टेबलस्पून
- जिरे - १ टीस्पून
- हिंग - १/८ टीस्पून
- हळद - १/८ टीस्पून
- मेथी दाणे - १/४ टीस्पून
- कढिलिंब - ७-८
- मीठ - स्वादानुसार
- गूळ - ६ टेबलस्पून
Instructions
- टोमॅटोच्या फोडी एका मायक्रोवेव्ह सेफ बाउल मध्ये घालून त्यात थोडे पाणी (१/४-१/२ कप) घाला.
- मायक्रोवेव्ह मध्ये एखादा मिनिट शिजवून घ्या.
- मिक्सर मध्ये घालून फिरवून घ्या. (मिक्सर मधून काढल्यानंतर जर टोमॅटोच्या बिया किंवा सालं दिसत असतील तर गाळून घ्या नाहीतर गाळायची गरज नाही. )
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, मेथीचे दाणे व काढिलिंब घाला.
- त्यावर मिक्सर मधून काढलेला टोमॅटो पल्प घाला (कृतिक्रमाक ३).
- त्यात पाणी घालून (अंदाजे १ कप) मीठ व गूळ घाला.
- उकळी आल्यावर गॅस बंद करा.
- गरम गरम टोमॅटोचे सार जेवणाबरोबर वाढा.