- Serving: २ जणांसाठी
फुलका रेसिपी
वेस्टर्न जेवणातील ब्रेडची जागा घेणाऱ्या अनेक इंडियन पदार्थांमधला एक म्हणजे फुलका. उत्तर भारतात जास्त बनविला जाणारा हा पोळीचा प्रकार ताजा व गरम गरम खायला खूपच छान लागतो. कोणत्याही कोरड्या किंवा ओल्या भाज्यांबरोबर किंवा उसळी व डाळीबरोबर फुलका हा झटपट बनविता येणारा पदार्थ आहे.
Ingredients
- गव्हाचे पीठ (कणीक) - १ कप आणि थोडे फुलके लाटताना पसरायला
- मीठ - १/४ टीस्पून
- तेल किंवा तूप - १/२ टीस्पून आणि थोडेसे फुलक्यांना वरून लावायला
Instructions
- एका तसराळ्यात गव्हाचे पीठ, मीठ, व १/२ टीस्पून तेल किंवा तूप मिसळून घ्या.
- त्यात हळू हळू लागेल तसे पाणी घालून त्याची मऊसर कणीक भिजवून घ्या.
- वरून थोडे तेल किंवा तूप लाऊन १०-१५ मिनिटे झाकून ठेऊन द्या.
- फुलका लाटायला घ्यायच्या आधी तवा तापायला ठेवा.
- कणकेचा एक ते दीड इंच मोठा भाग घेऊन तो हाताने गोल करून चपटा करून घ्या.
- गोळा दोन्ही बाजूने गावहाच्या पिठात बुडवून घ्या.
- आता हलक्या हाताने लाटत लाटत अंदाजे ५ इंच मोठा फुलका लाटून घ्या. लाटताना मधे किंचित जाड व कडा पातळ राहतील असे लाटा. जरूर वाटल्यास मधे मधे आणखीन पीठ लावायला ही हरकत नाही.
- लाटलेला फुलका गरम तव्यावर टाकून मोठ्या आचेवर भाजायला घ्या.
- फुलक्याच्या वरील बाजूस छोटे छोटे फुगवटे दिसू लागताच फुलका दुसऱ्या बाजूस उलटून टाका.
- मध्ये मध्ये फुलका उचलून पहा. जेंव्हा तव्याकडील बाजूवर एकसारखे काळे डाग दिसू लागतील तेंव्हा एका हाताने तवा बाजूला करून दुसऱ्या हाताने फुलका उचलून डायरेक्ट विस्तवावर टाका.
- फुलका पूर्ण फुगू द्या व फुगला की अलगद चिमट्याने उचलून परत पोळपाटावर किंवा एखाद्या डब्यात काढून घ्या.
- फुलक्यावर दोन्ही बाजूला थोडे थोडे तेल किंवा तूप लाऊन गरम गरमच वाढा किंवा एका मऊसर कापडात गुंडाळून झाकणाच्या डब्यात ठेवा.
- अश्याच पद्धतीने उरलेल्या कणकेचेही फुलके लाटून व भाजून घ्या.