- Serving: १०-१२ लाडू
कणकेचे लाडू रेसिपी
कणकेचे लाडू हे एक अतिशय चविष्ट व विशेष प्रकाराचे कुरकुरीत लाडू आहेत. ह्यात घातलेल्या पोह्यांमुळे ह्यांना कुरकुरीतपणा येतो व हे डिंकाच्या लाडवाप्रमाणे लागतात. म्हणूनच ह्या लाडवांना 'फसवे डिंकाचे लाडू' किंवा 'गरीबाचे लाडू' असेही ओळखले जाते.
Ingredients
- गव्हाचे पीठ (कणीक) - १ & १/२ कप
- तूप - १/२ कप
- पोहे (मध्यम जाड) - १/२ कप
- खसखस - २ टेबलस्पून
- किसलेले खोबरे - १/४ कप
- पिठीसाखर - १ कप
- वेलदोड्याची पूड - आवडीप्रमाणे
Instructions
- किसलेले खोबरे गुलाबी होईपर्यंत भाजून एका तसराळ्यात काढून घ्या.
- खसखस भाजून गुलाबी रंगाची करून घ्या व त्याच तसराळ्यात काढा.
- एका कढईत तूप गरम करून घ्या.
- त्यात थोडे पोहे टाकून बघा व जर ते तरंगून लगेच वर येत असतील व फुगत असतील तर याचा अर्थ तूप तापले आहे. तसे झाल्यास उरलेले पोहे ही घाला.
- तसे झाल्यास उरलेले पोहे ही घाला.
- सतत हालवत पोहे फुगून किंचित गुलाबी होईपर्यंत चांगले तळून घ्या. (निदान एक मिनिट तरी सगळे पोहे तुपात तळले गेले पाहिजेत.)
- तळलेले पोहे एका बशीत काढून घ्या.
- पोहे तळून उरलेल्या तुपात कणीक घालून, ती मध्यम आचेवर गडद रंगाची होईपर्यंत खमंग भाजून घ्या.
- गॅस बंद करून भाजलेली कणीक कोमट होण्यास ठेवा.
- कणीक कोमट होईपर्यंत तसराळ्यात ठेवलेल्या खसखस-खोबऱ्याच्या मिश्रणात (कृतिक्रमांक १ आणि २) पिठीसाखर व वेलदोड्याची पूड घालून मिसळून घ्या.
- कोमट झालेली कणीक वरील मिश्रणात घालून हाताने चांगले मळून मऊ करून घ्या.
- तळलेले पोहे (कृतिक्रमांक ७) ही त्यात घालून मिसळून घ्या.
- थोडे मिश्रण हातात घेऊन त्याचे लाडू वळता येतात का ते पहा. जर अजून वळता येत नसतील तर थोडे (१-२ टेबलस्पून) तूप घालून परत वळून पहा.
- हाताने मळून गोल लाडू वळून घ्या.