- Cook Time: 45 minutes
चटणी पोडी रेसिपी
चटणी पोडी ही एक साऊथ इंडियन जेवणातील कोरडी चटणी आहे. ही चटणी पुष्कळ साऊथ इंडियन पदार्थांबरोबर जसे इडली, डोसा, वगैरे बरोबर किंवा धिरडे, पोळी किंवा भाकरी बरोबर ही छान लागते.
Ingredients
- हरभऱ्याची डाळ - १ कप
- उडदाची डाळ - १/२ कप
- सुके खोबरे - १/२ कप
- तीळ - १/४ कप
- तेल - २ टेबलस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- मेथी दाणे - १/२ टीस्पून
- शेंगदाणे - १/२ कप
- कढिलिंब - १ & १/२ कप
- चिंच - १ टेबलस्पून
- गूळ - १ टेबलस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
Instructions
- हरभऱ्याची डाळ गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या.
- उडदाची डाळ गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या.
- दोन्ही डाळी एकत्र मिसळून एका तसराळ्यात गार होण्यासाठी ठेऊन द्या.
- तीळ व सुके खोबरे वेगवेगळे गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. दोन्ही मिळून एका वेगळ्या तसराळ्यात काढून घ्या; भाजलेल्या डाळींबरोबर मिसळू नका.
- कढईमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिंग, मेथी दाणे, आणि शेंगदाणे घाला. शेंगदाणे गडद रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- त्यातच कढिलिंब घालून चांगले परतून घ्या. कढिलिंब तडतडेपर्यंत परता. व मग गॅस बंद करा.
- हरभऱ्याची डाळ व उडदाची डाळ एकत्र मिक्सर मध्ये थोडी भरड वाटून घ्या.
- आता बाकीची सामग्री, खोबरे, तीळ, हिंग, मेथी, शेंगदाणे आणि कढिलिंब, सर्व मिक्सर मध्ये घाला व त्यातच चिंच, गूळ, लाल तिखट व मीठ ही मिसळा. सर्व एकत्र बारीक वाटून घ्या.
- आता वरील मिश्रण डाळींच्या भरड वाटलेल्या मिश्रणाबरोबर मिसळून सर्व पुन्हा एकत्र वाटून घ्या.
- चटणी पोडी ही किंचित भरडच असते. त्यामुळे खूप बारीक वाटू नका.
- चटणी पोडी एका एअर-टाइट डब्यात भरून ठेवा व पोळी किंवा भाताबरोबर किंवा कोणत्याही साउथ इंडियन पदार्थांबरोबर वाढा.