- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 15 minutes
दाण्याची चटणी (कोरडी)
दाण्याची कोरडी चटणी हे महाराष्ट्रीय जेवणात डावीकडे वाढता येण्यासारखे एक चविष्ट तोंडीलावणे आहे. ही चटणी पारंपारिक पद्धतीनुसार खलबत्त्यात कुटून बनविली जाते पण आधुनिक स्वयंपाकघरात मी ही फूड प्रोसेसर वापरून बनवायचा प्रयत्न केला आहे. ह्या चटणीत जर लसूण घातला नाही तर ही उपासाला ही चालते. वरून दही घालून घेतल्यास ही चटणी पोळीबरोबर व उपासाच्या काही पदार्थांबरोबर जसे उपवासाचा डोसा, साबुदाणा थालीपीठ, साबुदाणा वडा इत्यादि पदार्थांबरोबर ही खायला छान लागते.
Ingredients
- शेंगदाणे - २ कप
- जिरे - ४ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - २-३ टीस्पून किंवा स्वादानुसार
- साखर - २ टीस्पून
- लसूण (ऐच्छिक) - ४-५ मोठ्या पाकळ्या
- तेल - १-२ टीस्पून
Instructions
- एका कढईमध्ये शेंगदाणे बारीक ते मध्यम आचेवर भाजून घ्या. दाण्यांवर छोटे छोटे काळपट डाग दिसायला लागल्यावर गॅस बंद करून टाका.
- गार झाल्यावर हाताने चोळून त्यांची सालं काढून घ्या.
- एका ताठलीत किंवा सुपात दाणे पाखडून सालं काढून टाका.
- जिरे, मीठ, तिखट आणि लसूण (ऐच्छिक) एका मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- त्यात वर भाजून ठेवलेलेल्यातले (कृतिक्रमांक ३) १/२ कप दाणे घालून परत सगळे बारीक वाटून घ्या. असे वाटल्यामुळे दाण्यांना थोडे तेल सुटेल.
- वाटलेली ही सगळी सामग्री आता एका फूड प्रोसेसर मध्ये घाला वा त्यात उरलेले शेंगदाणे ही घाला.
- १-२ टीस्पून तेल ही त्यातच घाला व सर्व एकसारखे व भरड असे वाटून घ्या. फूड प्रोसेसरमुळे दाणे एकसारखे व हवे तितके भरड वाटता येतील.
- तयार चटणी घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून ठेवा जेवणाबरोबर वाढा.