उपासाचा डोसा रेसिपी
उपासाला चालणारा हा डोसा खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतो. हा डोसा तुम्ही बटाटाच्या उपासाच्या भाजीबरोबर व उपासाच्या लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर वाढू शकता.
Ingredients
- वऱ्याचे तांदूळ - १ कप
- साबूदाणा - १/२ कप
- शेंगदाणे - १/४ कप
- जिरे - २ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २
- मीठ - चवीप्रमाणे
- तेल - आवश्यकतेनुसार
Instructions
- वऱ्याचे तांदूळ, साबूदाणा व शेंगदाणे २-३ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- २-३ तासांनंतर वरचे पाणी काढून घ्या व त्यातलेच पाणी जरूर असल्यास वापरून, सर्व मिक्सर मध्ये थोडेसे रवाळ वाटून घ्या.
- वाटताना त्यातच जिरे, मिरच्या, व मीठ ही घाला. नेहमीच्या डोसाच्या पिठाप्रमाणेच हे पीठ पातळ असायला हवे.
- तवा गरम करून त्यावर ३-४ टेबलस्पून पीठ तव्याच्या मधोमध घाला व पळीने किंवा एका चमच्याने गोल गोल फिरवत पातळ पसरा.
- डोस्याच्या कडेने व मधे थोडे थोडे (१/२ टीस्पून) तेल सोडा.
- डोस्याच्या कडा किंचित ब्राऊन दिसायला लागेपर्यंत शिजू द्या.
- मग उलतन्याने डोसा काढून गरम गरमच वाढा.
- वाढताना बरोबर उपासाची बटाट्याची भाजी व उपासाचे लोणचे किंवा कोथिंबिरीची चटणीबरोबर वाढा.