- Prep Time: 30 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: २-३ जणांसाठी
भरली ढब्बू मिरची रेसिपी
ढब्बू मिरची ची ही भाजी खायला तर खमंग असतेच पण दिसायला ही वेगळी व चटपटीत दिसते. ढब्बू मिरची ही भाजी पौष्टिक आहेच शिवाय आत भरलेला बटाटा ह्या भाजीला आणखीन चवदार बनवितो. खास करून मुलांना ही भाजी फार आवडेल.
Ingredients
- ढब्बू मिरची - ३
- बटाटा - ४ मध्यम आकाराचे
- तेल - आवश्यकतेनुसार
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- आल्याची पेस्ट किंवा किसलेले आले - २ टीस्पून
- लसणाची पेस्ट - २ टीस्पून
- हिरव्या मिरच्या ठेचलेल्या - ३/४ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- कांदा - १ बारीक चिरलेला
- गरम मसाला - १ टीस्पून
- आमचूर - ३/४ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- चाट मसाला (ऐच्छिक) - वरून पसरायला
Instructions
- ढब्बू मिरच्या स्वच्छ धुऊन घ्या व देठाच्या कडेकडेने अर्धवट कापून घ्या ज्यामुळे देठ झाकणाप्रमाणे उघडबंद करता येईल. (जर मिरच्या मोठ्या असतील तर आडव्या कापून अर्ध्या करून घ्या). सुरीने सावकाश देठ मोडू न देता आतल्या बिया काढून टाका.
- बटाटे उकडून सालं काढून घ्या व हाताने फोडून बारीक तुकडे करून घ्या. पूर्ण कुस्करु नका.
- एका कढई मधे ३ टीस्पून तेल गरम करून त्यात हिंग, हळद, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेला कांदा घाला.
- सर्व एकदा मिसळून त्यात गरम मसाला घाला.
- कांदा किंचित गुलाबी दिसेपर्यंत परता.
- आता त्यात बटाटा घाला व परत एकदा मिसळून चवीप्रमाणे मीठ घाला.
- एखादा मिनिट परतून गॅस बंद करून टाका.
- हे सारण गार होण्यासाठी ठेऊन द्या.
- सारण गार झाल्यावर ढब्बू मिरच्या सारणाने भरून घ्या. वरच्या बाजूला देठाचे झाकण ठेवण्यासाठी थोडी जागा ठेवा. (जर मोठ्या ढब्बू मिरच्या अर्ध्या कापून वापरल्या असतील तर त्या वरपर्यंत भरून घ्या.
- देठाचे झाकण ठेऊन बंद करा.
- एका सपाट तळ असलेल्या पॅन मध्ये तळ भरेपर्यंत तेल घाला व तेल गरम करून घ्या.
- तेलात भरलेल्या ढब्बू मिरच्या ठेऊन बारीक-मध्यम आचेवर त्या परतायला ठेवा. दर २-३ मिनिटांनी फिरवत फिरवत सगळीकडे काळपट डाग पडेपर्यंत त्या खमंग शिजवून घ्या.
- सगळीकडून एकसारखे डाग पडल्यावर गॅस बंद करा व एका ताठलीत काढून घ्या.
- वरून आवडत असेल तर थोडा चाट मसाला शिंपडा.
- गरम गरम भरल्या ढब्बू मिरच्या पोळीबरोबर वाढा.