- Serving: ३०- ३५ वड्या
आल्याची वडी (आलेपाक)
आल्याची वडी किंवा आलेपाक ही थंडीत खाण्यासाठी एक चविष्ट स्नॅक् आहे. खरं तर ही वडी किंवा बर्फीपेक्षा कॅण्डीसारखी जास्त लागते. किंचित तिखट स्वाद असलेली ही वडी सर्दी झाल्यावर चघळायला खूप छान वाटते.
Ingredients
- आलं - अंदाजे ६-७ इंच मोठा तुकडा
- दूध - ३ टेबलस्पून
- साखर - आल्याच्या पेस्टच्या तिप्पट (खालील कृति पहा)
- तूप - ताठलीला लावायला थोडेसे
Instructions
- आलं तासभर पाण्यात भिजवून ठेवा.
- सालं-काढण्याने त्याची सालं काढून घ्या.
- त्याचे साधारण एक एक इंच मोठे तुकडे करून घ्या.
- दूध घालून त्याची मिक्सर मधे पेस्ट करून घ्या.
- ही पेस्ट मोजून बाजूला ठेऊन द्या.
- आल्याच्या पेस्टच्या तिप्पट साखर मोजून घ्या.
- एका ताठलीला थोडे तूप लाऊन तयार ठेवा.
- कढईमध्ये दूध-आल्याची पेस्ट आणि मोजून घेतलेली साखर घालून मध्यम आचेवर सतत हालवत शिजायला ठेवा.
- हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
- जेंव्हा हे मिश्रण चांगले घट्ट होईल आणि हालवायला जड जाईल तेंव्हा गॅस बंद करून तूप लावलेल्या ताठलीत ओता.
- पूर्ण गार झाल्यावर छोट्या छोट्या (अंदाजे एक इंच) वड्या कापून घ्या.