Uma's Kitchen

  • Home
  • Recipes
    • Snacks
    • Soups
    • Breads
    • Rice
    • Veggies
    • Lentils
    • Dosas
    • Salads
    • Dessert
  • Specialities
    • Drinks
    • Left-over-food recipes
    • Pickels/Chutneys
    • Spices
  • Collections
    • Video Recipes
    • Maharashtrian
    • North Indian
    • South Indian
    • Diwali
    • Chaat
  • Videos
  • More
    • Search
    • Marathi Blog
    • Blog
    • About
  • English
  • हिन्दी

भरली ढब्बू मिरची रेसिपी

भरली ढब्बू मिरची रेसिपी
  • Prep Time: 30 minutes
  • Cook Time: 30 minutes
  • Serving: २-३ जणांसाठी
Print

भरली ढब्बू मिरची रेसिपी

By Uma Abhyankar डिसेंबर 19, 2017

ढब्बू मिरची ची ही भाजी खायला तर खमंग असतेच पण दिसायला ही वेगळी व चटपटीत दिसते. ढब्बू मिरची ही भाजी पौष्टिक आहेच शिवाय आत भरलेला बटाटा ह्या भाजीला आणखीन चवदार बनवितो. खास करून मुलांना ही भाजी फार आवडेल.

Ingredients

  • ढब्बू मिरची - ३
  • बटाटा - ४ मध्यम आकाराचे
  • तेल - आवश्यकतेनुसार
  • हिंग - १/४ टीस्पून
  • हळद - १/२ टीस्पून
  • आल्याची पेस्ट किंवा किसलेले आले - २ टीस्पून
  • लसणाची पेस्ट - २ टीस्पून
  • हिरव्या मिरच्या ठेचलेल्या - ३/४ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
  • कांदा - १ बारीक चिरलेला
  • गरम मसाला - १ टीस्पून
  • आमचूर - ३/४ टीस्पून
  • मीठ - चवीप्रमाणे
  • चाट मसाला (ऐच्छिक) - वरून पसरायला

Instructions

  1. ढब्बू मिरच्या स्वच्छ धुऊन घ्या व देठाच्या कडेकडेने अर्धवट कापून घ्या ज्यामुळे देठ झाकणाप्रमाणे उघडबंद करता येईल. (जर मिरच्या मोठ्या असतील तर आडव्या कापून अर्ध्या करून घ्या). सुरीने सावकाश देठ मोडू न देता आतल्या बिया काढून टाका.
    IMG_0437
  2. बटाटे उकडून सालं काढून घ्या व हाताने फोडून बारीक तुकडे करून घ्या. पूर्ण कुस्करु नका.
    IMG_0295
  3. एका कढई मधे ३ टीस्पून तेल गरम करून त्यात हिंग, हळद, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेला कांदा घाला.
  4. सर्व एकदा मिसळून त्यात गरम मसाला घाला.
  5. कांदा किंचित गुलाबी दिसेपर्यंत परता.
  6. आता त्यात बटाटा घाला व परत एकदा मिसळून चवीप्रमाणे मीठ घाला.
  7. एखादा मिनिट परतून गॅस बंद करून टाका.
  8. हे सारण गार होण्यासाठी ठेऊन द्या.
    IMG_3565
  9. सारण गार झाल्यावर ढब्बू मिरच्या सारणाने भरून घ्या. वरच्या बाजूला देठाचे झाकण ठेवण्यासाठी थोडी जागा ठेवा. (जर मोठ्या ढब्बू मिरच्या अर्ध्या कापून वापरल्या असतील तर त्या वरपर्यंत भरून घ्या.
  10. देठाचे झाकण ठेऊन बंद करा.
    IMG_0438
  11. एका सपाट तळ असलेल्या पॅन मध्ये तळ भरेपर्यंत तेल घाला व तेल गरम करून घ्या.
  12.  तेलात भरलेल्या ढब्बू मिरच्या ठेऊन बारीक-मध्यम आचेवर त्या परतायला ठेवा. दर २-३ मिनिटांनी फिरवत फिरवत सगळीकडे काळपट डाग पडेपर्यंत त्या खमंग शिजवून घ्या.
  13. सगळीकडून एकसारखे डाग पडल्यावर गॅस बंद करा व एका ताठलीत काढून घ्या.
  14. वरून आवडत असेल तर थोडा चाट मसाला शिंपडा.
  15. गरम गरम भरल्या ढब्बू मिरच्या पोळीबरोबर वाढा.
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Pinterest

You may also like

View Recipe

उपासाची बटाट्याची भाजी रेसिपी

30 min
View Recipe

बटाटा आणि फ्लॉवर ची मसालेदार भाजी रेसिपी

30 min
View Recipe

बटाटा व फ्लॉवर ची भाजी रेसिपी

30 min

Post navigation

← गुळाची पोळी
आल्याची वडी (आलेपाक) →

Popular

मिक्स व्हेज परोठा रेसिपी

रगडा पॅटिस

आल्याची वडी (आलेपाक)

समोसा रेसिपी

कचोरी

About Author Uma Abhyankar View all posts

About

This site is about how strong family values, preserving and respecting different cultures can lead to a strong understanding within the society that can lead to a peaceful and prosperous world. Food is an important aspect of any culture. This is an attempt to capture all our family recipes and pass them on to the next generation. Occasionally I do write articles and poems.

Archives

  • एप्रिल 2023
  • मे 2022
  • फेब्रुवारी 2022
  • जानेवारी 2022
  • ऑक्टोबर 2021
  • जून 2021
  • मे 2021
  • एप्रिल 2021
  • मार्च 2021
  • डिसेंबर 2020
  • ऑक्टोबर 2020
  • मे 2020
  • एप्रिल 2020
  • फेब्रुवारी 2020
  • जानेवारी 2020
  • ऑगस्ट 2019
  • जुलै 2019
  • मे 2019
  • एप्रिल 2019
  • जानेवारी 2019
  • मे 2018
  • एप्रिल 2018
  • मार्च 2018
  • फेब्रुवारी 2018
  • जानेवारी 2018
  • डिसेंबर 2017
  • नोव्हेंबर 2017
  • ऑक्टोबर 2017
  • सप्टेंबर 2017
  • जून 2017
  • मे 2017
  • एप्रिल 2017
  • मार्च 2017
  • फेब्रुवारी 2017

Menu

  • Home
  • Snacks
  • Veggies
  • Breads
  • Dessert
  • Marathi
  • About

Recent Posts

  • झटपट गोड चटणी रेसिपी
  • दिंड रेसिपी
  • गाजराची चटणी रेसिपी
  • कडबू रेसिपी
  • पाकतल्या पुऱ्या
© 2015 Uma Abhyankar. All Rights Reserved.