- Serving: २-३ इंचाच्या १० टोपल्या
टोकरी चाट
टोकरी चाट हा एक खूपच आकर्षक व चटपटीत असा 'चाट' चा प्रकार आहे. हिंदी मधे 'टोकरी' म्हणजे टोपल्या. ह्या रेसिपी मध्ये बटाट्याच्या सुंदर टोपल्या किंवा परड्या बनवून त्यात आवडत असेल ते फिलिंग ठेवता येते. इथे मी दोन प्रकारचे फिलिंग दिले आहेत पण तुम्ही हे आपल्या आवडीप्रमाणे अनेक पद्धतीने बनवू शकता. ह्या टोपल्या तुम्हाला सॅलड किंवा फ्रूट डेकोरेशन साठी ही वापरता येतील.
Ingredients
- 'टोकरी' साठी :
- बटाटे - ५ मध्यम आकाराचे
- मीठ - स्वादानुसार
- फिलिंग प्रकार १ साठी :
- मोड आलेले मूग - १/२ कप वाफवलेले
- बटाटे - १/२ कप उकडून बारीक चिरलेले
- लाल किंवा पिवळी ढब्बू मिरची - १ बारीक चिरलेली
- काकडी - १ छोटी छोटे तुकडे केलेली
- कांदा - १ छोटा बारीक चिरलेला
- कोथिंबीर - सजावटीसाठी बारीक चिरलेली
- चाट मसाला - २-३ टीस्पून किंवा स्वादानुसार
- काला नमक (सैंधव मीठ) - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- लिंबाचा रस - १ टेबलस्पून
- चिंचगुळाची गोड चटणी - आवश्यकतेनुसार
- हिरवी चटणी (कोथिंबिरीची किंवा पुदिन्याची) - आवश्यकतेनुसार
- दही (ऐच्छिक) - आवश्यकतेनुसार
- बारीक शेव - आवडीप्रमाणे
- फिलिंग प्रकार २ साठी :
- उकडलेले पांढरे वाटणे (छोले) - १/२ कप
- बटाटे - १/२ कप उकडून बारीक फोडी केलेले
- कांदा - १ छोटा
- कोथिंबीर - आवडीप्रमाणे
- लिंबाचा रस - १ टेबलस्पून
- चाट मसाला - २-३ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे
- काला नमक (सैंधव मीठ) - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- चिंचेची गोड चटणी - आवश्यकतेनुसार
- हिरवी चटणी (कोथिंबिरीची किंवा पुदिन्याची) - आवश्यकतेनुसार
- दही (ऐच्छिक) - आवश्यकतेनुसार
- बारीक शेव - आवश्यकतेनुसार
Instructions
'टोकरी' साठी :
- बटाटे जाड जाड किसून १५-२० मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा.
- मग एका रोळीत घालून पाणी काढून टाका.
- एका पेपर टॉवेल वर बटाटे पसरून ठेवा व वरून अजून एका पेपर टॉवेल ने दाबून जेवढे निघेल तेवढे पाणी काढून टाका.
- बटाट्यावर थोडे मीठ पसरून घ्या.
- एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.
- मग एक गाळणे किंवा खाली दाखविल्याप्रमाणे एखादा खोलगट झारा घ्या.
- त्यामधे बाजूने वर पर्यंत किसलेला बटाटा पसरून घ्या.
- त्यावर आणखीन एक पळी किंवा चमचा अलगत धरून गरम तेलात बुडवा.
- किसलेला बटाट्याच्या पट्ट्या थोड्याच वेळात एकमेकाला चिकटतील. तेंव्हा वरची पळी हळूच काढून घ्या.
- बटाटा सोनेरी रंगाचा झाल्यावर गाळणे / खोलगट झारा बाहेर काढा.
- व एका पेपर टॉवेलवर पालथं घालून टोपली बाहेर पाडून घ्या.
- अश्याच पद्धतीने संपूर्ण किसलेल्या बटाट्याच्या टोपल्या करून घ्या.
- मोड आलेले मूग, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, लाल किंवा पिवळी बारीक चिरलेली ढब्बू मिर्ची, काकडी, कांदा, व कोथिंबीर एका भांड्यात मिसळून घ्या.
- ह्या मिश्रणावर सैंधव मीठ, चाट मसाला, लाल तिखट, व लिंबाचा रस पिळून घ्या.
- सर्व मिसळून तयार ठेवा.
- आवडत असेल तर दही ही थोडे घुसळून तयार ठेवा. (दही वापरत असल्यास लिंबू घालू नका.)
- उकडलेले वाटणे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, व कोथिंबीर एकत्र मिसळून घ्या.
- त्यात सैंधव मीठ, लाल तिखट, चाट मसाला व लिंबू घाला.
- सर्व मिसळून तयार ठेवा.
- आवडत असल्यास थोडे दही ही घुसळून तयार ठेवा. (दही वापरत असल्यास लिंबू घालू नका.)
सर्व्ह करताना :