
- Yield: ४ जणांसाठी
- Prep Time: १० minutes
- Cook Time: ४५ minutes
- Serving: ४ जणांसाठी
चवळीची उसळ
चवळी हा एक शाकाहारी जेवणातील प्रोटीन्स व फायबरचा चांगला स्रोत आहे. चवळीची उसळ बनवायला अगदी सोपी आहे. इथे मी महाराष्ट्रीयन गोडा / काळा मसाला वापरून ही रेसिपी दिली आहे.
Ingredients
- चवळी - १ कप
- तेल - ३ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- कांदा - १ छोटा बारीक चिरलेला
- लसूण - १ टीस्पून बारीक कापलेला किंवा लसणाची पेस्ट
- हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट - स्वादानुसार
- मीठ - स्वादानुसार
- काळा / गोडा मसाला - २ टीस्पून
- गूळ - १ & १/२ टीस्पून
- जिऱ्याची पूड - १/२ टीस्पून
- टोमॅटो - १ बारीक चिरलेला
- कोथिंबीर - सजावटीसाठी बारीक चिरलेली
- लिंबाचा रस - (ऐच्छिक) आवडीप्रमाणे
Instructions
- चवळी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या व त्यात २ कप पाणी घाला.
- प्रेशर कुकर मध्ये तीन शिट्ट्या येईपर्यंत चवळी शिजवून घ्या. तीन शिट्ट्या झाल्यावर पाच मिनिटे गॅस बारीक करून ठेवा व मग बंद करा.
- कुकर गार झाल्यावर चवळी बाहेर काढून घ्या. शिजलेल्या चवळीतील अंदाजे ३ टेबलस्पून चवळी एका वेगळ्या बाउल मधे काढून मॅश करून घ्या व परत बाकीच्या चवळीमधे मिसळा. ह्यामुळे नंतर उसळीचा रस दाट व्हायला मदत होईल.
- पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, बारीक चिरलेला कांदा, व लसूण घाला.
- कांदा लसूण किंचित ब्राउन दिसेपर्यंत परतून घ्या.
- त्यात अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घाला व आणखीन एखादा मिनिट टोमॅटो मऊ होईपर्यंत परता.
- आता त्यात शिजलेली चवळी घाला व रस किती हवा आहे त्या हिशोबाने पाणी घाला.
- चवीप्रमाणे मीठ, काळा मसाला, गूळ, जिऱ्याची पूड व मिरच्या किंवा लाल तिखट घालून सर्व मिसळून घ्या.
- आता उसळीला उकळी येऊ द्या व शेवटी उरलेला टोमॅटोच्या फोडी ही घाला.
- एखादा मिनिट उकळल्यावर गॅस बंद करून टाका.
- उसळ वाढायच्या वेळी वरून थोडा लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून मग गरम उसळ पोळी किंवा भाताबरोबर वाढा.