- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
- Serving: २ जणांसाठी
वाल पापडीची भाजी रेसिपी
वाल पापडी ची ही भाजी अगदी साधी रेसिपी आहे. कमीत कमी मसाले वापरून बनविलेली ही भाजी अतिशय पौष्टिक आहे व चविष्ट ही लागते. हिरव्यागार भाजीवर पांढरे ताजे खवले खोबरे घातले तर ही दिसायला ही आकर्षक दिसते.
Ingredients
- वाल पापडी - २ कप
- तेल - २ टीस्पून
- मोहरी - १/४ टीस्पून
- हिंग - एक चिमूटभर
- हळद - १/४ टीस्पून
- धन्याची पूड - १/२ टीस्पून
- जिऱ्याची पूड - १/२ टीस्पून
- कोथिंबीर - बारीक चिरलेली वरून पसरायला
- ताजे खवलेले खोबरे - वरून पसरायला
- मीठ - चवीनुसार
- हिरवी मिर्ची - अगदी बारीक चिरलेली
- साखर - १ टीस्पून
Instructions
- वाल पापडीच्या शिरा काढून घ्या व त्या स्वच्छ धुऊन मग बारीक चिरा.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व हळद घाला.
- मग बारीक चिरलेली पापडी घाला व सर्व मिसळून घ्या.
- चवीप्रमाणे भाजीत मीठ, मिर्ची, धन्याची पूड, व जिऱ्याची पूड घाला.
- मंद आचेवर झाकण ठेऊन भाजी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. साधारण १०-१५ मिनिटात भाजी चांगली शिजेल. पण दर पाच मिनिटाने भाजी हलवायला विसरू नका.
- चांगली शिजल्यावर गॅस बंद करा.
- वरून ताजे खवले खोबरे, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही वाल पापडीची भाजी पोळी बरोबर वाढा.